
प्रतिनिधी:प्रकाश जैस्वार
मुंबई,राष्ट्र सेवा दल, मालवणी आणि काचपाडा येथील सेवादल सैनिकांनी रविवारी सकाळी आरे बचाव आंदोलनात भाग घेतला. मेट्रो कार शेड साठीच्या विवादास्पद मुद्यावर गेले काही सलग आठवडे दर रविवारी आरेत आंदोलनकर्ते जमत आहेत. आज मालाड मालवणी व काचपाडा राष्ट्र सेवा दलातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात हजेरी लावली.

राष्ट्र सेवा दल मालवणी विभागाचे निसार अली सय्यद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात वैशाली महाडिक, मेरी चेट्टी, नमिता मिश्रा, मनोज परमार ,कृष्णा वाघमारे,फिरोझ अन्सारी,सुरेश शेलार,समीर खसन,अनिल गुप्ता,कांता वर्मा,दिपक वर्मा,आणि साथींनी आरे बचाव आंदोलनात भाग घेतला.

राष्ट्र सेवा दल मुंबईचे कार्यकर्ते याआधीही तीन वर्षांपूर्वी आरे बचाव आंदोलनात सक्रिय सहभागी होते. केवळ राष्ट्र सेवा दलाच्याच नव्हे तर एकूणच सर्व आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी राष्ट्र सेवा दल मुंबई ‘आरेचे पाठिराखे’ म्हणून कायमच सोबत आहे.
