आशिया खंडांतील सर्वात मोठा “नवीन वाडा शस्त्र संग्रहालय”सोलापूर

Share

!
लेखक :सुरेश बोर्ले.

महाराष्ट्रच योगदान हिंदुस्थानाच्या इतिहासात मोठ आहे.भारतावर अनेक आक्रमणे झाली!ती भारताच्या राजे राजवाड्यांनी थोपवून परतून लावली.पण मोघल बादशहानी जो उच्छाद मांडला होता,त्याला समर्थपणे प्रतिकार केला ते छत्रपती शिवाजी राजे भोसले! हे आमच्या महाराष्ट्राची शान आहेत!आमच्या हिंदुस्थानचे राष्ट्र पुरुष आहेत.छत्रपतींना अल्प आयुष्य लाभलं! ते ह्या देशाचं आणि महाराष्ट्रच दुर्दैव आहे. नाहीतर ह्या हिंदुस्थानचा इतिहास काहीं औरच असता. महाराजांननंतरही,भोसले वंशज घराणी महाराष्ट्रात परिचित आहे. त्यातील सोलापुरातील भोसले घराणे हे सुद्धा इतिहासाची साक्ष ठेऊन आहेत.अनेक जुन्या इमारती त्याची साक्ष देत आहेत. राजे भोसले म्हटले की,आठवण होते सातारा कोल्हापूर आदी ठिकाणांची.पण सोलापुरातही भोसले ववशजआजही ताठ मानेने उभे आहेत.
श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यावर,भक्तांनी नक्की अनभिनीत अशा भोसले घराण्याच्या “नवीन राजवाडा”येथे भेट द्यावी.आशिया खंडातील सर्वत मोठ्या शस्त्रागार संग्रालय दगडी महालात आपल्याला पहायला मिळेल. त्यामध्ये इतिहासकालीन योध्यांची त्यांनी प्रत्यक्षात वापरलेली शस्त्रे व आयुध्ये अतिशय व्यवस्थित अजूनपर्यंत जपून ठेवलेली आहेत,ती सगळीअतिशय नीटनेटकेपणाने रचलेली आहेत.जीआपण कुठल्यातरी प्रदर्शनात मोजकीच पाहतो.पण ह्या ठिकाणी शस्त्रांचा भांडारच आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतो.पारंपरिक पद्धतीने वापरलेल्या तलवारी व त्यांचे अनेक प्रकार.ढाली,कट्यारी, बिचावे, तीर बाण ,चिलखते, दानडपट्टे, भाले,बरचे, खंजीर,साखळदंडआयूध्ये,
रणशिंगे, धातूंची गदा धोप,फरश्या,हत्ती वाहक माहूत अवजारे,दिवट्या,मशाली,
दामटी,तुतारी,अशी असंख्य जी प्रत्यक्षात युद्धात वापरलेली आहेत,त्यांची रचना व मांडणी अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने मांडणी येथे केलेली आहे. सगळ्यात आकर्षक म्हणजे जुन्याकाळी वापरण्यात आलेल्या बंदुकांचे प्रकार.ह्या बंदुकांचे दसते लाकडी असल्याने,ते आता खराब झालेले आहेत.पण प्रदर्शनात अजूनही शाबुत आहेत.ब्रिटिश कालीन बंदूका, गावठी पिस्तुले व त्यांचे अनेक प्रकार व नंतर त्यात काळानुसार झालेले बदल आदींचे जतन अगदी व्यवस्थितपणे आहे. तर राजे राजवाड्यांनी केलेल्या शिकारी व प्राण्याच्या परिकृती त्यामध्ये वाघ,गवे,मगरी अन्य अवशेष अजूनही जपून ठेवलेले आहेत.राजकुमारांनी वापरलेली खेळणी,घड्याळे,स्वानानची खेळणी ही सुद्धा पाहण्यासारखी आहेत.तर भोसले घराण्यांचे सध्याचे वंशजही कचेरीत बसलेले असतात.अगदी साधी राहणीमान व बोलके व्यक्तिमत्व त्यांचे आहे.हे संग्रहालय पाहून झाल्यावर,जाताना आपल मन अगदी खिन्न होत.कारण धारधार शास्त्राने सामोरा समोरलढून! त्या वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वराज्याचा हा डोलारा उभा केला.ही शस्त्रे पाहून ते कसे लढले असतील? ह्या शस्त्रांवरती त्यांचे ठसे अजूनही इतिहासाची साक्ष देत आहेत.अक्कलकोट स्वामी हे प्रमुख आकर्षण आहे.तो भक्तिभाव आहे.पण हा ऐतिहासिक ठेवा सुद्धा महत्वाचा आहे. तोही आपण पाहावा.हीच मनोकामना आहे.


Share

One thought on “आशिया खंडांतील सर्वात मोठा “नवीन वाडा शस्त्र संग्रहालय”सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *