
प्रतिनिधी :सुरेश बोरले
जग :इस्राईलवर हमासने केलेला हल्ला.व या हल्ल्या मूळे अरब इस्राईल संबंध पुन्हा एकदा विपरीत दिशेने वळणार.
इस्राईल हे एक शक्ती शाली राष्ट्र आहे.कोणत्याही परिस्थितिला तोंड देणारी जनता.आपल्या राष्ट्राला स्वकर्तृतवान,बनवण्यासाठी झटणारी ही जनता,म्हणून नाव लौकीक आहे.मात्र तरी ही पॅलेस्टाईन मधील हमास या संघटनेने अचानकपणे इस्राईल वर हल्ला करत मोठी मनुष्य व आर्थिक हाणी केली.खाडी देशांच्या आसपास अरब देशांवर इस्राईल चा दबदबा असून ही हा हल्ला कसा झाला जगातील सर्वात श्रेष्ठ समजली जाणारी मोसाद नावाची संस्थेचे हे अपयश आहे. कारण एवळा मोठा हल्ला काय एक दिवसाच्या तयारीने होतनाही त्यासाठी पूर्व तयारी करावी लागली असेल आणि त्यासाठी अनेक महिने अथवा दिवस लागले असतील.
इस्राईल आणि पॅलेस्टाईन मधील अशांततेच मुख्य कारण गाझापट्टी हा आहे.
हा भाग इस्राईलच्या अधिपत्या खाली आहे . आणि मागील अनेक दशकापासून वाद सुरु आहे तसेच अनेक वेळी संघर्ष होत शनिवार दि.०७/१०/२०२३ रोजी,अचानक पॅलेस्टाईन च्या “हमास”ह्या संघटनेने,इस्राईलवर अचानक हजारोंच्या संख्येने रॉकेटचे गोळे डागले.त्यामध्ये इस्राईल मध्ये मोठी जीवित हानी व सांपत्तिक हानी झालेली आहे. मात्र या अशा कृतीने जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाई त पडते की काय अशी अनेक देशान्ना भीती वाटू लागली आहे.एकी कडे
रशिया व युक्रेन युद्ध सुरूच आहे तर जगात अशी बरीच राष्ट्रे आहेत, त्यांचे शेजारी राष्ट्रांशी बिलकुल पटत नाही.ते सुधा एकमेकांवर कुरघोडी करीत असतात.म्हणजे ही गोष्ट जागतिक महायुद्ध साठी खत पाणी आहे. आपण “हमास” ही संघटना काय आहे?हे पाहू!हमास हा शब्द वेगळ्याच धरतीचा आहे.उदा. नासा,ए सी आय आय वगैरे,प्रचलित शब्द नाही.हमास ही पॅलेस्टाईन इस्लामिक कार्यकारी संघटना 1987 साली उदयास आली.ही इस्लामी क्रांतिकारक संघटना आहे.हीची पाळेमुळे इजिप्त मध्ये रुजलेली आहेत.पण त्यापूर्वी 1950 साली “फताह” ही संघटना, गाझापट्टी मध्ये धार्मिक स्थळांवर होती.त्या दोन्ही संघटना 1987 ला एकत्र आल्या व त्यांनी “हमास”ही संघटना स्थापली. 1990ते2000साला पर्यंत अनेक घातपाती हल्ले या संघटनेने इस्राईलवर केले.म्हणून पॅलेस्टाईन जनतेने हमास ला स्वीकारले.2007 साली फताह ही संघटना हरली मग गाझापाट्टीवर हमास ने ताबा मिळवला.आपले पायगाझापट्टीत रोवल्यवर,अनेक हल्ले इस्राईलवर हमासने केले.आत्ता ही हमास संपूर्ण इस्राईल विरुद्ध गझपट्टीत कार्यरत आहे.आत्ता ह्या संघटनेकडे अत्याधूनिक हत्यारे व दारूगोळा आहे.अनेक इस्त्राईल विरोधी देश व दहशतवादी संघटना हमासला मदत करीत आहेत.ह्या सगळ्या अस्त्रांचा उपयोग ते इस्रायली सैन्य व नागरिकांवर वार करण्यासाठी करीत आहेत.आत्ता असाच उपयोग हमासने इस्राईल वर केला.आत्ता हमास कडे लांब पल्ल्याची शस्त्रे आहेत.शनिवारी त्यांनी हजारो रॉकेटसचा हल्ला इस्राईलवर केला.यात मोठी जीवितहानी व वित्तीय हानी झाली. इस्रायलने पॅलेस्टाईन व हमास वर पलटवार सुरू केलेला आहे.हमास ची निंदा बऱ्याच देशांनी केलेली आहे.तर हमास ची पाठराखन अनेक देशांनी केलेली आहे.जे मुळात इस्राईल विरोधी समजले जातात.पण या अचानक पुकारलेल्या युद्ध मूळे जर का कोणी परमाणू अस्त्रांचा वापर केला ,तर मग येथून कदाचित!3रे महायुद्ध सुरू होऊ शकते,असे भाकीत लोक करीत आहेत.कारण इस्राईलच्या मागे अमेरिका,ब्रिटन,फ्रान्स,जर्मनी,ऑस्ट्रेलिया,अल्जेनिया,ऑस्टरीया,ब्राझील,कॅनडा,कोलंबिया,जॉर्जिया,हंगेरी,इटली,स्लोव्हेनिया आदी राष्ट्रे आहेत.पॅलेस्टाईन व हमास बरोबर,चीन,तुर्की, इराण,पाकिस्तान,कुवैत व कांहीं आखाती देश पाठीराखे आहेत.पुतीन ह्यांनी हे युद्ध थांबवावं असे कळवले आहे.तर पंतप्रधान मोदींनी,इस्राईलला पाठिंबा जाहीर केला आहे.कारण इस्राईल भारताचा जुना मित्र आहे,ह्या देशाचे संबंध भारताशी चांगले आहेत.मोदींचं समर्थन योग्य आहे.शेवटी भारत ही अश्या दहशतवादी कारवायांनी त्रस्थ आहे.तर हमास ही सुध्धा दहशतवादी संघटना आहे.म्हणून हा निर्णय योग्य आहे.संपूर्ण जगात अनेक राष्ट्रांचे आपसात पटत नाही.जर का हे युद्ध पेटल तर 3र्या महायुद्धाची नांदी ठरेल!पाहिलं महायुद्ध 14जुलै 1914 ते 11नोव्हेंबर 1918 ला समपले.दुसरे महायुध्द 1सप्टेंबर 1939 ते 1945 पर्यंत चालले.पण ही दोन्ही महायुद्धे परवडली.पण आत्ता जरका 3रे महायुध्द झाले तर जगाचा विनाश अटळ आहे.कारण जगावर वर्चस्व गाझवीण्या साठी चीन व अमेरिका एकमेकांना विरुद्ध कुरघोडी करीत आहेत.संपूर्ण विश्व हे आधुनिक अस्त्रांनी भरलेलं आहे.ही आस्त्रे सगळ्यानकडे आहेत.दक्षिण कोरिया,उत्तर कोरिया हा वाद सुरू आहे.जगात वाद कुठे नाही?आपल नी पाकच घ्या!हे सगळे विश्वाचे न सुटणारी कोडी आहेत.ज्या प्रमाणे म्हण आहे, सुंभ जाळला तरी वळ नाही जात.तशी स्थिती आत्ता इस्राईल विरुद्ध हमास व गाझा पट्टी असा तिकडं आहे.तीन तिघाडा काम बिघाडा तशी स्थिती होऊ शकते.ह्या कुरघोडीत गरीब देश भरडतात.कोविड ची परिस्थिती जगाने २ वर्षे पाहिलेली आहे.तर उत्तर कोरिया त माथेफिरू माणसेही आहेत,जी जगाला जुमानत नाहीत . आपल्या परीने शस्त्र निर्मिती करतात.हीच जगाला घातक स्थिती आहे.ह्यांनीच जग विनाशाकडे चालले आहे,हे निश्चित!रशिया युक्रेन युद्ध! तसेच इस्राईल पॅलेस्टाईन आणि हमास मध्ये चाललेले वाद? राष्ट्रां न राष्ट्रांमध्ये न पटणारे संबंध ,हीच येणाऱ्या महायुधाची नांदी?