उत्तर मुंबईतील स्कूल वॅन मुलींसाठी असुरक्षित ?

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा बाबू डे.

मुंबई : उत्तर मुंबईत शाळा व खाजगी स्कूल वॅनमधून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, बेकायदेशीर व नियमबाह्य विद्यार्थी वाहतुकीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ), उत्तर मुंबई जिल्ह्याने प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

आरपीआय (अ) उत्तर मुंबई जिल्ह्याचे सचिव विनोद पांडुरंग घोलप यांनी अप्पर पोलीस आयुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) यांना निवेदन देत मालाड, गोरेगाव, कांदिवली व बोरिवली परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर स्कूल वॅनकडे लक्ष वेधले.

अनेक वॅनमध्ये चालक व अटेंडंटची पोलीस पडताळणी नसणे, महिला अटेंडंटचा अभाव, परवाना व परमिटशिवाय वाहतूक, तसेच फिटनेस सर्टिफिकेट, जिपीएस, स्पीड गवर्नर (Fitness Certificate, GPS, Speed Governor) नसल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकार मोटार वाहन कायदा व पोकसो (POCSO) कायद्याचे उल्लंघन असल्याचे नमूद करण्यात आले.

नियमभंग करणाऱ्या स्कूल वॅनवर तात्काळ कारवाई, वाहन जप्ती, महिला अटेंडंट सक्ती व निष्काळजी शाळा व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी आरपीआय (अ)कडून करण्यात आली आहे.


Share

4 thoughts on “उत्तर मुंबईतील स्कूल वॅन मुलींसाठी असुरक्षित ?

  1. मना पासुन आभार व्यक्त करतो खुप सुन्दर मुलानी मेहनत केली आहे

  2. हो खरी गंभीर गोष्ट आहे पण खरतर काहीच होत नाही सर्व भ्रष्टाचार पसरलेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *