उत्तर मुंबई जिल्हा रिपाई (अ) जिल्हा अध्यक्ष?

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले.

मुंबई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ ) च्या उत्तर मुंबई जिल्ह्यात नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया वेग घेत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी मुंबईतील सर्व तालुका व वार्ड कमिट्या बरखास्त करून नव्याने सभासद नोंदणी मोहीम सुरू केली आहे.
उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष बदलीबाबतचे निवेदन रामदास आठवले यांना सादर करण्यात आले असून, महाराष्ट्र कोषाध्यक्ष ऋषी माळी, तसेच मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि मुंबई सरचिटणीस विवेक पवार यांनाही जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्यांसह निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी रामदास आठवले यांनी लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, उत्तर मुंबईतील कार्यकर्त्यांची बैठक लवकरच घेण्याचे निश्चित करण्यात आले असून ती दिद्धार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. तसेच विवेक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद नोंदणी मोहीम आणि जिल्हाध्यक्ष बदल प्रक्रियेबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
या शिष्टमंडळात मुंबई प्रदेश उपाध्यक्ष हरीश मांडवीकर, दिलीप व्हावळे (दहिसर तालुका अध्यक्ष), अशोक कांबळे (मागाठाणे तालुका अध्यक्ष), जगदीश झाल्टे (चारकोप तालुका अध्यक्ष), सुनील गमरे (मालाड तालुका अध्यक्ष), अनिल कोकणे (जिल्हा सरचिटणीस), प्रवीण झा, राजेश साळवे, श्याम पासी, हेमंत दळवी तसेच युवक आघाडीचे उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिंदे यांचा समावेश होता.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *