
प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली, राजकीय गोंधळात एकता व्यक्त केली.
नवी दिल्ली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची त्यांच्या राष्ट्रीय राजधानीतील निवासस्थानी भेट घेतली.उद्धव ठाकरे यांनी या आधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्चर्व भूमीवर उद्धव ठाकरेंच्या या भेटी मागे सीट शेअरिंग आणि इंडिया गठबंधन तसेच महा विकास आघाडीत समन्वयकाची भूमिकेत दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोमाने सुरु आहे तसेच भाजपा सह महायुती आणि शिंदे सेनेत ही या भेटी बाबत आतल्या आत चर्चा सुरु असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली.
Greatbhet