प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
महाराष्ट्राचे कृषी मंत्री विधान भवनात सत्र चालू असताना, मोबाईलवर रमी खेळतानाचा वी डी ओ पसरला होता.त्या प्रकरणात बराच गाजावाजा झाला.अनेक अनुचित प्रकारही घडले.सदर घटने बाबत,कृषी मंत्र्यांचा राजीनामा होणार हे निश्चित वाटत होते.कारण विरोधकही आक्रमक
होते.पण उपमुख्यमंत्र्यांना ते भेटल्यावर,गेम पालटला.फक्त थातुर माथूर चौकशी करून, त्यांचा राजीनामा घेण्याचा बेत रद्द झाला.ही अतिशय वाईट गोष्ट घडलेली आहे.कडक शिस्तीचे फुटीरवादी पवार गटाचे नेते म्हणून आपण मिरवता,मग आता काय झालं?हेच तर दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्यांनी केले असते तर,तुम्ही रान उठवले असते. अशा कारवाईने आपलीच नामुष्की झालेली आहे,हा माणूस चालू सत्र काळात मोबाईलवर जुगार खेळतो, तो आपल्या चालतो.जे शेतकरी अतिशय हालाकीत जीवन जगून, आत्महत्या करी आहेत, ते आपल्याला दिसत नाहीत.त्यांना माफी नाही. शेतकऱ्यांनो तुम्ही अशीच आत्महत्या करी रहा!आमचे सुटाबुटातील मंत्री म्हात्र, बळीराजाचे प्रश्न विधान भवनात मांडण्यापेक्षा!चालू सदनात ते रमी खेळू शकतात.त्यांच्याकडून त्वरित राजीनामा घेतला असता तर ! ती कारवाई योग्य झाली असती. श्रीमान उपमुख्यमंत्री आपण केलेल्या ह्या कृत्याने, आपली नाचक्की जनमानसात झालेली आहे.याची नोंद आपण घ्यायची आहे.ह्याचे पडसाद आपल्याला येणाऱ्या काळात दिसतीलच.योग्य संधी व वेळ आल्यास,शेतकरी, सामान्य जनता आपल्याला आपली जागा दाखवेलच.ही काळ्या दगडावरची रेष आहे.
कारवाई होणारच नाही