प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई: गेली साठ वर्षांहूनही अधिक काळ दादरच्या शिवाजी पार्क येथे नेहमी प्रमाणे
शिवतीर्थावर दसरा मेळावा पार पडला.शिवसेनेत फूट पडल्याने,
निष्ठावंतांचा मेळावा म्हणून हा प्रसिद्ध आहे.कारण भर पावसातही साहेबांच्या विचारवंत कार्यकर्त्यांची गर्दी होती. अनेकांची भाषणे झाल्यावर,सेना प्रमुख व माजी मुख्यमंत्री
मा.उद्धवजी ठाकरे हे काय बोलणार?याची ओढ लोकांना होती!
आपल्या भाषणात त्यांनी प्रथम महाराष्ट्राची पूर परिस्थिती व बळीराजाची आर्थिक मदत!तसेच कर्जमाफीचा मुद्दा उचलून त्यांनी उचलून धरला.
रु.५०,००० एकरी नुकसान भरपाई त्यांना त्वरित द्यावी!असे ठणकावले. भाजपा विरुद्ध तोंडसुख घेताना त्यांनी देशातील
लेह लडाख व मणिपूर येथील परिस्थिती सांगितली. मराठी व भूमिपुरांसाठी मातोश्री व शिवतीर्थ हे नेहमीच एकत्रित असतील.तर शेवटी राज्याचे मुख्यमंत्री ह्यांच्या विरोधात बोलताना,त्यांनी माझवलेला
राज्यातील अंधार घालण्यासाठी!
तुमच्यासाठी जी मशाल हाती घेतली आहे.ती तेवत ठेवणं तुमचं काम आहे!अस आवाहन त्यांनी
तमाम शिवसैनिक व जनतेला केल.त्यावेळी मंचकावर
नेते उपनेते व आमदार खासदार उपस्थित होते.कारण ज्यांनी पळवले ते पितळ होत आणि सोन अर्थात हा निष्ठावंत सैनिक माझ्याकडे राहील.असे उदगार त्यांनी सुरुवातीला काढले.
Great
मस्स्त
Great