उमरखाडी सार्वजनिक गोकुळ काला मंडळाचे पौराणिक देखावे..

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

मुंबई : उमरखाडी सार्वजनिक गोकुळ काला मंडळा चे हे यंदा ७७ वर्षाचे औचित्य साधून परंपरेनुसार यंदाही गोपाळकाला दिवशी ३ भव्य पौराणिक देखावे चित्ररथ (ट्रक) वर उभारणार असून त्यात आकर्षक वेशभूषा केलेली मुले- मुली सहभागी होतील. सोबत बॅन्ड पथक, बेंजो पार्टी- ढोल ताशांच्या तालावर रंगीबेरंगी कपड्यातील गोविंदा नाचत गाजत दहीहंडी फोडण्याचे कौशल्य दाखवण्यासाठी शनिवार  दिनांक १६ ऑगस्ट रोजी, उमरखाडी मुंबई येथे सकाळी ९ वाजता गोविंदा मिरवणूक गणेश चौक येथून सुरु होणार आहे. तसेच ही गोविंदा मिरवणूक दक्षिण मुंबई तील कुंभारवाडा, गिरगांव, ठाकूरद्वार, भु-लेश्वर, मुंबादेवी, चिंचबंदर, डोंगरी या विभागात फिरवण्यात येणार आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.


Share

2 thoughts on “उमरखाडी सार्वजनिक गोकुळ काला मंडळाचे पौराणिक देखावे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *