एक आठवडा विविध उपक्रम.

Share

मुंबई :चारकोप सह्याद्रीनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयात दिनांक ८/१२/२०२५ ते १६/१२/२०२५ या कालावधीत आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन व विविध स्पर्धांचा व्यापक उपक्रम राबविण्यात आला.

या कालावधीत बीएमसी आरोग्य केंद्रातर्फे घटसर्प (DT) व धनुरवात लसीकरण, रयत शिक्षण संस्थेमार्फत एकाच वेळी दोन लाख विद्यार्थ्यांसाठी दातांच्या आरोग्यावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्र, ICICI Lombard मार्फत डोळ्यांची तपासणी व मोफत चष्मा वाटप, IDF मार्फत मुलींसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शन व किट वाटप करण्यात आले. तसेच हस्ताक्षर व पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. आज “आपत्ती व्यवस्थापन” या विषयावर विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले.

माजी पालक व निवृत्त फायरमन माणिक सावंत यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला.
मुंबई अग्निशमन दल, मालवणी येथील फायरमन संदीप वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींची माहिती देत त्यावरील उपाययोजना सविस्तरपणे समजावून सांगितल्या. तसेच अग्निशमन दलातील करिअरच्या संधी, भरती प्रक्रिया व आवश्यक पात्रता याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी जवान गणेश श्रीकृष्ण बडगुजर व उमेश पाटील यांनी आग विझवण्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थ्यांमध्ये आपत्तीजन्य परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याचा आत्मविश्वास निर्माण केला.

या प्रशिक्षण वर्गास विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मदनराव चव्हाण, मुख्याध्यापिका शिल्पा जरे, सर्व शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. आश्लेषा नितेश साळुंखे हिने प्रशिक्षक व उपस्थितांचे आभार मानले.


Share

2 thoughts on “एक आठवडा विविध उपक्रम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *