एसएमएस -प्रतिनिधी.
मुंबई :बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025–2026 च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारासाठी पदयात्रा, प्रचार फेरी आदी उपक्रमांना सुलभ परवानगी मिळावी यासाठी ‘एक खिडकी योजना’ राबवण्यात आली आहे. मात्र पी/उत्तर विभागात ही योजना अपेक्षेप्रमाणे कार्यरत नसल्याचा आरोप मुंबई काँग्रेसने केला आहे.
पी/उत्तर विभागातील प्रभाग क्रमांक 32 ते 35 तसेच 46 ते 49 मधील राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रचारासाठी परवानगी मिळवताना मोठ्या विलंबाला सामोरे जावे लागत आहे. परवानगीसाठी अर्ज करूनही प्रतिनिधींना तासन्तास कार्यालयात ताटकळत बसावे लागत असल्याने उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेला फटका बसत असल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात मुंबई काँग्रेसचे महासचिव संतोष चिकणे यांनी महानगरपालिका आयुक्त तसेच निवडणूक निर्णय अधिकारी आणि पी/उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे दिनांक ५ जानेवारी रोजी, लेखी तक्रार केली आहे. ‘एक खिडकी योजनेचा लाभ उमेदवारांना होण्याऐवजी अडथळे वाढत असून याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे,’ असे त्यांनी नमूद केले.
प्रशासनाने या विषयावर स्वतः लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, जेणेकरून निवडणूक प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान व वेळेवर संधी मिळेल, अशी मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.
अनेक अपक्ष उमेदवारांनी पालिके कडून परवानग्या देण्यात जाणीव पूरक विलंब केल्याचे आरोप केले आहेत.
Bmc तुलास्वतवर भरोसा नायका?
Very pathetic bmc