
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : राष्ट्र सेवा दल,पुणे आणि जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, महाराष्ट्रचे पूरग्रस्त भागातील लोकांसाठीचे मदत कार्य सुरू झाले आहे. प्राथमिक पाहणी करुन योग्य ठिकाणी गरजू लोकांपर्यंत मदत पोहचवणेसाठी या दोन्ही संघटना नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहेत. जमा आर्थिक सहयोगातून मदत किट बनवणेत आली आहेत. ही मदत आजपासून येत्या आठवड्यात संबंधितांना पोहोच होईल. या सर्व कामाचा वस्तुनिष्ठ अहवाल कळवला जाणार आहे.
पूरग्रस्तांना मदत करतानाची एक चतुःसुत्री डोळ्यासमोर आहे, शिधा, शिक्षण, शेळी, शिवार.
या क्रमाने मदत करताना नुकतेच राज्य सरकारने आरोग्य किट आणि शिक्षण किट देणार असल्याचे जाहीर केले आहे. पण त्याचे स्वरूप आणि पर्याप्तता पाहून काही गोष्टी ठरवता येणार आहेत. सध्या पूर ओसरताच रोगराई पसरू शकते, डासांचा त्रास वाढू शकतो त्यामुळे त्या पद्धतीनेही पुढाकार घ्यावा लागणार आहे.

Good job. God bless you all.
भूकंप असो की पुर आपत्ति च्या काळात नेहमी अग्रेसर राष्ट्र सेवा दल…
Great
Well done
Great initiative