ऑनलाईन अजान अँप चा वाढता उपयोग…!!

Share

विशेष प्रतिनिधी

मुंबई,ता.29 ; राज्यात विशेषतः मुंबईत मशिदीच्या भोंग्यावरून दिलेल्या अजानवरुन वाद पेटला होता.तामिळनाडूच्या इनोवेटीव्ह लॅबने विकसित केलेल्या एका ऑनलाईन अजान अँपमुळे  हा वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. अजानच्या वेळी अलार्म प्रमाणे हे ॲप आपोआप फोन सुरु करते. आतापर्यंत. पन्नास हजार मुस्लिम बांधवांनी हे अँप डाऊनलोड केले असून ध्वनी प्रदूषण, धार्मिक वाद मिटवण्यासाठी हे अँप परिणामकारक असल्याचे मुस्लीम बांधवानी माहिती दिली आहे.

राज्यात विशेषता अजान मुळे होणाऱ्या त्रासाचा मुद्द्यावरुन मनसेने आंदोलन उभारलं होत. हे आंदोलनामुळे दोन समुदायामध्ये तणावाचे कारण ठरले होते. मात्र अजान ऑनलाईन अँपमुळे यावर तोडगा निघाला आहे. भाविकाला ज्या  मशिदीतून अजान ऐकायची आहे, त्यांनी त्या  मशिदीला हे एपशी  जोडून घ्यावे लागेल. एकदा काय ऑनलाईन अजान अँप शी जोडून घेतले तर त्यानंतर  मोबाइलवर अजान ऑनलाइन ऐकू शकता.  आपण दररोज सकाळी उठण्यासाठी मोबाईल अलार्म वापरतो. बहुतेक हा आवाज एक संगीताचा असतो. मात्र हा अलार्म तूम्ही  ऑनलाइन अजान अँपसह फजरची (सकाळ) अजान बदलू शकता. मोबाईल फोनमध्ये अजान लावल्याने लोकांना नमाजची वेळ कळते.

अनेक  मुस्लिम समाजातील तरुण, पुरुष कामासाठी बाहेर पडतात, मशिदिपासून त्यांचे कामाचे ठिकाण दूर असते, अजानाच्या वेळी अनेकजण कार किंवा बाईकने प्रवास करतात. ऑनलाइन अजान एप असल्यामुळे त्यांना सुन्नतनुसार अजानला प्रतिसाद देण्याची आणि वेळेवर नमाज पढण्याची आठवण हा अँप करून देतो. अनेकांची घरे मशिदीपासून लांब असतात,त्यामुळे त्यांना स्पिकरच्या अजानाचा आवाज येत नाही.घरी  एसी सुरु असल्यावर अजानचा आवाज स्पष्ट ऐकु येत नाही. ऑनलाइन अजान एपमुळे अजान स्पष्टपणे ऐकण्यास आणि प्रतिसाद देण्यास त्यांना मदत मिळते.

जर तुमच्या मशिदीतून अजान ऐकायची असेल तर  तुमच्या मशिदीला जोडलेले हे अँप वापरण्यास सांगावे लागेल. त्यानंतर तुम्ही अजान तुमच्या मोबाइलवर ऑनलाइन ऐकू शकता.मात्र त्या साठी हे अँप मोबाईलमध्ये इंस्टॉल करावे लागणार आहे. त्यासाठी  ऑनलाईन अजान इंनव्हेटिव्ह लॅबच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन आणि इंस्टॉलेशन करून मिळत. 

लाऊडस्पीकर, आवाज वादावर  ऑनलाईन अजान अँप हा उत्तम आणि विनाखर्चीक उपाय आहे. ध्वनी प्रदूषण, धार्मिक वाद मिटवण्यास याचा भरपूर वापर आवश्यक आहे. आतापर्यंत पन्नास हजारहुन अधीक भाविकांनी हे अँप डाउनलोड केले आहे.ही संख्या कमी असली तरी हळूहळू याचा वापर वाढणार असल्याचे सांगीतले जाते. हे ॲप आपल्याला वेळेवर प्रार्थना करण्याची आठवण करून देते, ज्यामुळे दररोज अल्लाहच्या जवळ राहण्याचा हा एक सुंदर मार्ग बनतो असे माहीमच्या जामा मशिदीचे विश्वस्त – सिराज पेटीवाला

वृद्ध आणि अपंगांना मशिदीत जाता येत नाही. या ॲपमुळे  ते घरबसल्या अजान ऐकू शकतात आणि या अँप मुळे जागरूकता ही वाढणार -इरफान मच्छीवाला, सामाजिक कार्यकर्ते

या ॲपमुळे धार्मिक तेढ निर्माण होणार नाही. तसेच ध्वनी प्रदूषण टाळण्यासोबत सामाजित सलोखा राखण्यासाठी मदत होईल आणि वेळेनुसार तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे.-फहाद पठाण, राहिवासी.


Share

One thought on “ऑनलाईन अजान अँप चा वाढता उपयोग…!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *