ऑल जर्नलिस्ट्स अँड फ्रेंड्स सर्कल’चे कोल्हापुरात 27 डिसेंबरला राज्यस्तरीय संमेलन..

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

पत्रकांच्या संमेलनाची जय्यत तयारी, शेकडो पत्रकार सहभागी होणार

मुंबई,राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटना अर्थात ऑल जर्नलिस्ट्स अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या पत्रकार संघटनेचे 17 वे महाराष्ट्र प्रदेश संमेलन मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी करवीर नगरी कोल्हापुर येथे भरवण्यात येत आहे. या संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्र राज्यातील संघटनेचे कर्तव्य दक्ष होतकरू पत्रकारांचा व पत्रकार मित्रांचा सन्मान करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय विषयाचे जानकार पत्रकार जतीन देसाई यांच्या हस्ते प्रदेश संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांच्या अध्यक्षतेखाली होऊ घातलेल्या प्रदेश संमेलनामध्ये माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ.संभाजी खराट यांचे उपस्थित पत्रकार मित्रांकरिता ‘बदलती पत्रकारिता आणि आव्हाने’ यासह अन्य विषयांवर प्रमुख मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. कोल्हापुरातील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज स्मारक या ठिकाणी हे प्रदेश संमेलन होणार आहे.

ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल परिवारातील सदस्य, पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, प्रदेश अध्यक्ष कांचन जांबोटी, प्रदेश कार्याध्यक्ष नीलेश पोटे विदर्भ कार्याध्यक्ष राहुल कुलट, महाराष्ट्र प्रदेश संघटक दिनकर पतंगे,
AJFC मुंबई, अध्यक्ष निसार अली सय्यद व मुंबई टीम च्या वतीने करण्यात आले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *