एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई: मराठी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल (AJFC) या राष्ट्रीय पत्रकार संघटनेतर्फे देण्यात येणारे राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांची अधिकृत घोषणा संघटनेचे केंद्रीय सचिव अतुल होनकळसे आणि प्रदेश सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत यांनी केली.
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचा भव्य पुरस्कार वितरण सोहळा १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान लातूर येथील परिवर्तन सभागृह, शाम नगर, अंबाजोगाई रोड (डॉ. जटाळ हॉस्पिटलच्या मागे) येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावर्षी राज्यातील विविध जिल्ह्यांत पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे आहेत –
जितेंद्र पराडकर (रत्नागिरी – दैनिक सामना),
प्रा. एल. डी. सरोदे (अकोला – दैनिक अजिंक्य भारत),
राजेंद्र कांबळे (नांदेड – दैनिक पुढारी),
केदार पाथरकर (पूर्णा, परभणी – दैनिक देशोन्नती),
शेख अफसर शेख सत्तार (पूर्णा, परभणी – दैनिक भास्कर),
विलास जोशी (हिंगोली – कार्यकारी संपादक, दैनिक मराठवाडा केसरी),
सचिन आव्हाड (दौंड, पुणे – दैनिक पुण्यनगरी).
याअंतर्गत विविध स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार – जितेंद्र दत्तात्रय पराडकर (संगमेश्वर, रत्नागिरी – दैनिक सामना),
संपादक नानासाहेब जोशी स्मृती पुरस्कार – विलास चंद्रकांत जोशी (हिंगोली – कार्यकारी संपादक, दैनिक मराठवाडा केसरी),
पांडुरंग नंदराम भटकर ‘मूकनायक’ पुरस्कार – प्रा. एल. डी. सरोदे (अकोला – दैनिक अजिंक्य भारत),
मधुकर लोंढे स्मृती ग्रामीण वार्ताहर पुरस्कार – सचिन जगन्नाथ आव्हाड (दौंड, पुणे),
नवीन सोष्टे ज्येष्ठ पत्रकार स्मृती प्रेरणा पुरस्कार – राजेंद्र सत्यनारायण कांबळे (बिलोली, नांदेड),
मधू रावकर शहर युवा पत्रकार प्रेरणा पुरस्कार – केदार मल्लिकार्जुन पाथरकर (पूर्णा, परभणी),
तर एजेएफसी जीवनगौरव पुरस्कार लातूर जिल्हाध्यक्ष उमरदराज खान यांना जाहीर करण्यात आला आहे.
पत्रकारितेतील निष्ठा, निर्भीडता व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या मान्यवरांचा गौरव या सोहळ्यात करण्यात येणार आहे.
Good
Congrats