प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : सध्या मराठा आरक्षण आंदोलनं मुंबईत सुरू आहे.अनेक ठिकाणाहून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठा बंधू हजर झालेले आहेत. पण ओबीसी नेते मराठा आरक्षण मंचाचे नेते!, जरांगे पाटील ह्यांच्या कृतीवर आग पाखड करित आहेत.हे ओबीसी नेत्यांचे वर्तन योग्य नाही.असे जन मत आहे.कारण चमत्कार घडल्याशीवाय शिवाय नमस्कार करता येत नाही.मराठा समाज आंदोलन करताहेत त्यांना करू द्या?घटनेनुसार त्यांना आरक्षण मिळणे इतके सोपे नाही. नाहीतर केव्हाच आरक्षण सरकारे दिले असते.अच्छा संविधानात कुठे अस लिहिले आहे का!किंवा नमूद आहे का?की ओबीसी मध्ये कोणालाही आरक्षण कधीही केव्हाही मिळू शकेल? स्वार्थी घटनेच्या आधारावर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नाहीत. घटना समितीने कांहीं मागास वर्गासाठी तो वर्ग वर येण्यासाठी,फक्त १० वर्षाचेआरक्षण असावे!हे अशी तरतूद केली होती.कोणत्याही राज्य सरकार व केंद्र सरकारने हे समाप्त करा असे धोरण राबवल का?घटना बनवून, किती मोठा काळ लोटला.त्या वस्तुस्थितीत बदल झाला का?नाही ही एकगठ्ठा मतदानाची सोय झाली.पण धोरणात बदल झाला का? पुलाखालंन कितीतरी पाणी वाहून गेल,पण फरक का? ह्या कृतीने हा मागासलेला समाज एकत्रझाला मजबूत झाला. कणखर नेते त्यांना मिळाले, त्यामुळे आरक्षणाच्या ह्या मुद्द्याला कोणी हातच घातला नाही.कारण मोठ्या मोठ्या धुरिणांना माहिती होत की १० वर्षाच्या मुद्द्याला हात घातल्यास,हात भाजणार! ओबीसी साठी कुणी अस कणखर नेतृत्व केलं का?कोणी त्या विषया बद्दल आंदोलन केल का?मराठा सकल समाज हा एकत्र आहे.आज ते सरकार सरकार झोपवून दाखवू शकतात,तेवढी ताकद त्यांच्यात आहे.तुम्हीकरु शकता का?हे जनमत आहे.माकडचाळे ह्या पक्षातून तू पक्षात करणाऱ्या पुढाऱ्यांवर अवलंबून राहून कांहीं उपयोग नाही. ओबीसी आरक्षणा बद्दल फक्त स्व.शामराव पेजे ह्यांनीच १९५० च्या दशकांत आवाज उठवला होता,पण त्यांना ह्या समाजाकडून सहकार्य व मदत मिळाली नाही.हे मोठ दुर्दैव आहे.
Right
Right