
file photo
प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : कबड्डीच्या दुसऱ्या हंगामा पासून कबड्डीचा आघाडीचा चढाई पठ्ठा श्री प्रदीप नरवाल ह्याने आपली निवृत्ती,आज जाहीर केली आहे.कारण कधीना कधी प्रत्येक क्षेत्रात निवृत्ती ही येतेच व ती घ्यावीच लागते.ती सक्तीची आहे.
सरकारचा,नियतीचा,निसर्गाचा तो नियमच आहे.शेवटी मानवी शरीर आहे, त्यालाही मर्यादा आहेत.हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो.हे राहट गाडग पिढ्या पिढ्या चालू आहे.तो क्षण आज दिग्गज खेळाडू श्री,प्रदीप नरवाल ह्याच्या आयुष्यात आला.गावाकडे मातीच्या मैदानात कबड्डीच मैदान अगदी किशोर व्यापासन गाजवत! हा खेळाडी कबड्डी प्रीमियर लीग पर्यंत पोहोचला. कबड्डीत “डुबकी” हा प्रकार त्यानेच आणला व लोकप्रिय केला.मग त्याचे अनुकरण अनेक खेळाडूंनी केले,पण त्याच्यासारखी डुबकी कोणालाच जमली नाही म्हणून त्याला “डुबकीकिंग” हा किताब रसिकांनी दिला.इतका सराव त्याने डुबकीचा केला होता.आज सुरू झालेल्या १२ व्या कबड्डी प्रीमियर लीग मध्ये ह्या विक्रमी खेळाडूने, कबड्डी प्रेमींसमोर आपली निवृत्ती अगदी समाधानी मनाने जाहीर केली.तर क.प्री.लीगनेही त्याचा सत्कार केला.ही एक मोठ्या समाधानाची गोष्ट आहे.प्रदीपने २०१५ साली दुसऱ्या हंगामात बंगळुरू बुल्स संघाकडून, पहिला आपला सामना खेळला.आपल्या खेळाच्या जोरावर तो अनेक संघांचा अविभाज्य घटक बनला.एकंदर १० हंगामात त्याने १,८०१ गुणांची कमाई केलेली आहे.हा एक कबड्डीचा विक्रमच आहे.येणाऱ्या कबड्डीपटूंना हे एक आव्हानच आहे.असा गुणी आज खेळाडू कबड्डीतून अलविदा होतोय.भविष्यातील पुढील आयुष्यासाठी,भारतातील तमाम कबड्डी रसिकांतर्फे ह्या
डुबकी किंगला हार्दिक, हार्दिक शुभेच्या!
ByeBye king wish youa happy retirement