प्रतिनिधी :सुरेश बोरले

File photo
मुंबई,हिंदुस्तानी चित्रपट सृष्टीत अनेक एका पेक्षा एक कलाकार आले व गेले. काही क्षणात लोपले. तर काहींनी आपली छाप!या चंदेरी दुनियेवर सोडून गेले. ते आजही कलाकाराच्या माध्यमातून लोकांसमोर जिवंत आहेत. जुन्या जमान्यातील, कृष्ण धवल चित्रपट आजही,दूरचित्रवाणी वर दाखवले गेले, तरी तो जमाना तो काळ डोळ्यासमोरून गेल्याशिवाय राहत नाही. त्यावेळी त्या चित्रपट कलाकारांन वर चित्रित केलेली गाणी, आजही त्या कलाकारांची आठवण दिल्या शिवाय राहत नाही. असा एक कलाकार ,कृष्ण धवल ते रंगीत चित्रपटापर्यंत, त्याने अनेक प्रकारच्या अभिनयाच्या छटा चित्रपट त्यांनी उमटवल्या. त्याचे चित्रपट आजही दूरचित्रवाणी दाखवल्यास, स्वर्गीय, चंद्रशेखर ह्यांची आठवण होते.त्यांचं नाव चंद्रशेखर वैद्य.१९२३ ला त्यांचा जन्म हैदराबाद येथे झाला. त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाल्यानंतर, त्यांनी मध्येच शाळा सोडून, ते १९४० ला मुंबईला आले. त्यांनी ग्रेट ब्रिटन डान्सिंग संस्थेमध्ये डिप्लोमा केला.त्यावेळेस ह्या जादुई नगरीत, स्वर्गीय,दिलीप कुमार,राज कपूर,देवानंद, राजेंद्र कुमार सारख्या कलाकारांचा भरणा होता. अशा जादुई नगरीत स्वर्गीय, चंद्रशेखर यांनी अतिशय चांगली मेहनत करून त्यांनी आपली स्वतःची ओळख या चित्रपट नगरीस त्यांनी दिली.त्यावेळच्या लोकप्रिय गायिका स्वर्गीय, शमशाद बेगम! यांच्या शिफारशीने पुण्याच्या शालिमार स्टुडिओ मध्ये त्यांना नोकरी मिळाली.परंतु 1953 ला त्यांना वी. शांताराम यांच्या “सुरुंग “या चित्रपटात पहिल्या मुख्य नटाचे काम केले.मग ते कवी, मस्ताना, बरादरी,काली टोपी लाल रुमाल, ट्रीट सिंगर सारख्या चित्रपटात मुख्य भूमिकेत चमकले. त्यांना स्वर्गीय, भारत भूषण यांचीही मदत मिळाली.मग त्यांनी त्यावेळच्या शिखरावर असणाऱ्या कलाकारांसोबतही कामे केली.एक चांगला कलाकार म्हणून ते चमकले. वया नुसार नटांची कामे मिळणे दुर्मिळ झाल्यावर, 1960 व१९७० दशकात, चरित्र अभिनेता म्हणून त्यांनी अनेक नामांकित कामे केली व ते चित्रपट ब्लॉकबस्टर राहिले हे विशेष! त्यांच्या गेट वे ऑफ इंडिया, रुस्तम ए बगदाद, किंग कॉंग,जहा आरा या चित्रपटांतील चरित्र अभिनेता म्हणून कामेही चांगली उठली तसेच दूरचित्रवाणी वरील धारावाईक,”रामायण” या मालिकेत “सुमंताची”एक यादगार भूमिका त्यांनी केली. तर अशोक शेखर दूरचित्रवाणी निर्माता,हे त्यांचे पुत्र व शक्ती अरोडा त्यांचे नातू आहेत. जवळ जवळ अकरा वर्ष ते सिंता ह्या या संस्थेचे अध्यक्ष राहिले, त्यांनी त्यांनी अनेक चित्रपट सहकाऱ्यां बरोबर सींता या संस्थेची नवीन इमारत उभी व्हावी म्हणून सरकारी फेरे लावले, ती इमारत पूर्ण ही झाली.पण चंद्रशेखर जी हयातीत नव्हते.त्यांनी 110 पेक्षा अधिक चित्रपटात कामे केलेली आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चा चा च्या व स्ट्रीट सिंगर, या चित्रपटांना नामांकनेही मिळाली होती. त्यांना फिल्मी जगतात, चंद्रशेखर साहेब!या नावाने लोक ओळखायची. आपल्या कामाला त्यांनी नेहमी पहिली पसंती व बहुमान दिला. आपल्या कामाशी ते नेहमीच निष्ठावान राहिले. चित्रपट जगतात त्यांचे संबंध सगळ्यांशी सलोख्याचे होते, त्यामुळे त्यांना ह्या जगतात मानसन्मान होता. अनेक संस्थांशी ते निगडित होते फिल्मी जगतातील, दुय्यम दर्जाच्या लोकांसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. म्हणून त्यांना चंद्रशेखर साहेब म्हणून लोक पुकारायची.अशा या चांगल्या व बहू आयामी कलाकाराला चांगले आयुष्य लाभले. त्यांच्या वयाच्या 98 वर्षी त्यांच निधन मुंबईत निधन झालं! पण त्यांची मनाची अभिलाषा होती, ती म्हणजे शेवटचे दिवस त्यांनी आपल्या परिवारा सोबतच राहायची,त्याप्रमाणे त्यांना घरी आणण्यात आले व घरी आल्यावर त्यांची सेवा व व्यवस्था एखाद्या इस्पितळा सारखीच परिवाराने त्यांची केली. अशा चांगल्या कलाकाराला, मानाचा मुजरा!