प्रतिनिधी :मिलन शहा

मुंबई,चंद्रपूर लोकसभा काँग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने दिल्ली येथील वेदांत हॉस्पिटल येथे उपचार साठी दिनांक 28मे ला दाखल केले होते. खासदार बाळू धानोरकर यांना यापूर्वी पोटाचा आजार होता.
7 वर्षांपूर्वी त्यांनी वजन कमी करण्यासाठी (Bariatrics Surgery) शस्त्रक्रिया केले होते. त्यामुळे त्यांच्या आतड्यांमध्ये इन्फेक्शन झाले होते. तसेच किडनी चा ही त्रास होता. त्यांना पोटदुखी सुरू झाली. व त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.
दि.29 मे ला रात्री 2 वाजेच्या सुमारास उपचार चालू असताना त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती.तसेच दि.30 मे ला रात्री.3ते 3.30 वाजताच्या सुमारास त्यांचा वयाच्या 47 वर्षात निधन झाले आहे.
सण 2009 मध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणा वर सर्वप्रथम निवडणूक लढले होते मात्र त्यावेळेस ते पराभूत झाले होते.
तसेच 2014 ला ते शिवसेनेचे तिकिटावर विधानसभेवर निवडून आले त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणूक मध्ये ते काँग्रेस च्या तिकिटावर राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आले होते. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार. नाना पटोले व बाळासाहेब थोरात तसेच इतर वरिष्ठ नेतेपदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.