
प्रतिनिधी:मिलन शाह
मुंबई,महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळा साहेब ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री पदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडी चे सरकार राज्यात कोसळले होते.त्या पश्चात आज महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस चे काही बडे नेते यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश अध्यक्ष बाळा साहेब थोरात,माजी मंत्री नितीनराऊत,यशोमती ठाकूर सह आमदार झिशान सिद्दीकी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आज त्यांच्या खासगी निवास स्थान मातोश्री वर गेले होते.प्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई,आमदार भास्कर जाधव ,आदित्य ठाकरे,सचिन अहिर, दिवाकर रावते व इतर उपस्थित होते.