काँग्रेस प्रदेशाध्यांबद्दल चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध:सुरेशचंद्र राजहंस

प्रतिनिधी :मिलन शाह
मुंबई,भारतीय जनता पक्षाचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल बोलताना केलेला एकेरी उल्लेख हा संताप आणणारा आहे. लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार संविधानाने सर्वांना दिलेला आहे पण भाजपा नेत्यांना टीकाही सहन होत नाही. भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांबद्द:मिलन शाह ल बोलताना तारतम्य बाळगावे, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असे मातंग समाजाचे नेते व काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
नानाभाऊ पटोले हे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी विधानसभेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. आमचे नेते आमच्यासाठी आदरणीय आहेत, त्यांच्याबद्दल ‘अरे नाना पटोल्या’, असा एकेरी उल्लेख केलेला आम्ही खपवून घेणार नाही. आम्हालाही जशास तसे उत्तर देता येते पण काँग्रेस पक्षाची ती संस्कृती नाही व आमच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलताना विचार करुन बोलण्याची शिकवण आम्हाला दिलेली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे अनेक नेते काँग्रेस नेत्यांवर बोलताना अत्यंत खालची पातळी गाठतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार दिसून येतात. विरोधी पक्षातील नेत्यांना काँग्रेस पक्ष शत्रू समजत नाही जसे भाजपा समजतो. पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आमच्या नेत्यांवर पातळीसोडून बोलल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असेही काँग्रेस प्रवक्ते राजहंस म्हणाले.