
प्रतिनिधी : मिलन शहा
अहिल्यानगरकाँग्रेस ला मोठी गळती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे शिवसेना उबाठात प्रवेश. अहिल्यानगर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मनोज गुंडेचा, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अनीस चुडीवाला, महिला जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, महिला जिल्हा उपाध्यक्ष शैला लांडे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
ही गळती थांबेना