
प्रतिनिधी :फिरोझ अन्सारी
मालकाचा विश्वास संपादन करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, नाणी, बिस्कीट व विदेशी कंपनीचे घडयाळे चोरी
करून चिंतामणी यादव (24) पळून गेला होता. कांदिवली महावीर नगर येथे राहत असलेल्या फिर्यदिने तक्रार करताच कांदिवली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पोलिसांनी 24 तासाच्या आत बिहारला जाऊन चोराच्या मुसक्या आवळल्या ,अटक आरोपी हा सध्या पोलीस कोठडीमध्ये असुन अधिक तपास सुरू आहे.
कांदिवली पश्चिम येथील महावीर नगर फिर्यादी यांच्या कडे
चिंतामणी यादव 12 वर्षापासुन हाउस किपींग मॅनेजर म्हणुन काम करत होता. विश्वासु नोकराने फिर्यादीच्या राहत्या घरातील कपाटाच्या बनावट चाव्या बनविल्या आणि योग्य संधी साधुन लॉकर उघडून त्यातून अंदाजे एकूण रु. 46,50,000/- किंमतीचे सोन्याची दागिने, नाणी, बिस्कीट, घडयाळे व रोख रक्कम असे चोरी केले. घरातील दागिने लंपास झाल्याचे कळताच फिर्यादी यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात 26 ऑक्टोंबर 22 रोजी सायंकाळी तक्रार नोंदविली. पोलीस ठाण्यात गु.र.क्र. 1314/ 22 कलम 381 भा. दं. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर जाधव पोलीस निरीक्षक (गुन्हे) विशिखा वारे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक हेमंत गिते, पोलीस उप निरीक्षक इंद्रजित भिसे व पथकानी केला. तांत्रिक तपास व गोपनीय बातमीच्या आधारे आरोपीच्या मुळ गावी गेले. स्थानिक पोलीस ठाणे चंद्रमंडी
पोलीस ठाण्याच्या मदतीने बिहार राज्यातील जिल्हा जमुई येथील स्थानिक पोलीस ठाणे, चंद्रमंडी
यांच्या मदतीने गुन्हयातील आरोपीतास 27 ऑक्टोंबर रोजी 24 तासात अटक केले. तसेच चोरीस गेलेली मालमत्ता पंचांसमक्ष पंचनामा करून हस्तगत करण्यात आली.रोख रक्कम 846500/-,विविध कंपनीची महागडी घडयाळे व कॅमेरे 246000/ सोने, चांदी व हिऱ्यांचे दागीने एकूण 3591000/असा एकूण 4683548 रूपये किंमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली.. पोलीस निरीक्षक सोहन कदम गुन्हे प्रकटीकरण पथक पो. ह. सत्यवान जगदाळे, पो.गा. श्रीकांत तायडे, पो.ना. वाघुलकर पो.शि. सचिन भालेराव, पो. शि. रवी राउत, पो.शि. सुजन केसरकर, पो.शि. योगेश हिरेमठ, पो. शि प्रविण वैराळ, पो.शि. दादासाहेब घोडके, पो.शि. संदिप म्हात्रे पो.शि. चिरजीव नवलु, मपोशि रूपाली डाईगडे ( तांत्रिक मदत ) यांनी पार पाडली आहे.