काजूटेकडी वरील स्थानिकांचा लढा जिंकणारच…

Share

विशेष प्रतिनिधी

मुंबई,घाटकोपर अंधेरी लिंक रोड वर जागृती नगर मेट्रो स्थानक जवळ एमएमआरडीए चे काम कासव गतीने सुरू आहे.यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आपल्या काजू टेकडी च्या रहिवाश्यांचा होता.या रस्त्याच्या लगत असलेले मोठे गटार नव्याने आणि योग्य पध्दतीने फ्लो देऊन बनविणे होते.याचे काम एमएमआरडीए ने सुरू केल्यानंतर स्थानिकांनी ही मागणी केली होती आणि हे काम बंद झाले होते.या बाबत एमएमआरडीए प्रशासन आणि पालिका यांच्या मध्ये काही बांधकाम काढण्यावरून योग्य संवाद होत नव्हता.मात्र या मुळे भविष्यात काजू टेकडी वासीयांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले असते.जनतेचा हा रोष पोलीस प्रशासन , एमएमआरडीए आणि पालिका अधिकारी यांच्याकडे मांडला आणि एक संयुक्त बैठक घेऊन उपाययोजना करण्यास सांगितले.जनतेच्या या महत्त्वाच्या प्रश्नावर घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके सर, पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे सर यांनी पुढाकार घेऊन आज संयुक्त बैठकीचे आयोजन केले.या बैठकीला माझ्यासह एमएमआरडीएचे अधिकारी बिरादर सर, कन्सल्टन पराठे सर , संबंधित कंत्राटदार, जोरस सर, पालिका एन विभागाचे सहायक आयुक्त संजय सोनावणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बेलदार सर,जाधव सर आणि स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक डहाके सर उपस्थित होते.यातील तांत्रिक अडचणी, परवानग्या आणि त्या कश्या सोडवता येतील या बाबत चर्चा झाली.यात आम्हाला स्थानिक नागरिकांना गुरुकृपा बार ते काजू टेकडी च्या पायऱ्यांपर्यंत जमिनी लगत , खोल आणि योग्य स्लोप असलेले गटारच हवे अशी मागणी लावून धरली आणि सर्व अधिकाऱ्यांनी ती मान्य ही केली त्या बद्दल त्यांचे आभार…याच बरोबर सर्व अधिकारी आणि मी स्वतः त्या ठिकाणावर येऊन संयुक्त पाहणी देखील केली आणि सर्व अडचणी समजून घेतल्या.आता तात्काळ या कामाला प्रारंभ देखील होईल आणि ही कायमस्वरूपीची गलिच्छ विभाग करणारी समस्या निकाली निघणार आहे.याचे सर्व श्रेय हे काजू टेकडी चे रहिवासी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काजूटेकडी चे पदाधिकारी आणि घाटकोपर पोलीस ठाणे यांचे आहे.मी फक्त एक स्थानिक नागरिक म्हणून आपले प्रश्न सातत्याने प्रशासनाकडे योग्य पद्धतीने मांडत राहिलो आणि त्याला आज यश आले आहे.काजू टेकडी च्या राजाला हेच मागणे आहे, की स्थानिकांच्या सर्व समस्या सोडविण्याची अशीच ताकद पाठीशी राहू दे, आणि आपल्या सर्वांचे आशिर्वाद असू द्या…मग बघा आपला प्रभाग कसा समस्या मुक्त एकत्र मिळून करू असे मत पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बढे यांनी व्यक्त केले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *