
,
प्रतिनिधी:सुरेश बोरले
सदर लेख हा कुणाला चिडवायला किंवा कोणत्याही पक्षासाठी पाठवला नसून, लोकशाहीचा चौथा आधार असणाऱ्या आधारावर लिहीला आहे. जी वस्तुस्थिती आहे,ती मांडली आहे. कर भला तो, हो भला!. अच्छे का फल ही अच्छा! ही म्हणी तशी पूरक आहे. माणसाला सगळ्या क्षेत्रात लागू पडते. तुम्हाला कितीही संरक्षण कवच अथवा छत्र तुमच्या डोक्यावर असल, तरी देवाची छडी किंवा मार हा ज्याला पडतो,तो त्याला पडती कडेच नेतो. असं काहीच घडले ते टीकाकार,लोकांचे पोल खोल करणारे, लाच लुचपत भानगडी उघड करणारे, पैसे खाणाऱ्याला धडा शिकवणारे,अवैध अमाप संपत्ती गोळा करणाऱ्या, राजकारणांचे, कर्दन काळ!किती उपमा द्याल तेवढ्या या महाशयांना कमी पडतील. त्यांनी काही वर्षात राजकारणाच्या जोरावर,वर सांगितल्याप्रमाणे दोषी आहेत, त्यांची चौकशी व दोशी असल्यास,त्यांना तुरुंगवास! सगळया राजकारण्यांचे धाबे त्यांनी दमकुन सोडलेले आहेत. पण त्यांनी एकाच बाजूने खिंड लढवली, त्यांनी स्थानीय संघटनेवर आग पाखड केली. ती त्यांना भारी पडली.माझी खासदार,किरीट सोमय्या, यांच्या पक्षाने, एका स्थानिक संघटने बरोबर युती करताना, सोमैयांची, कृतीची कटूता ही स्थानिक पक्षाच्या मनात राहिल्याने,मग युतीचा जेव्हा फैसला झाला, त्यावेळेस सोमय्यांना करणीच फल भोगावे लागले.समोरच्या पक्षाने, स्पष्ट केले की सोमय्या जर सत्तेत असतील,तर युती नामुमकीन! आहे. ते जर युती पक्षांमध्ये असतील तर युती होणार नाही?मग सोमय्याना त्यांच्या पक्षाने, घरचा अहेर दिला.ती युती झाली,पण मात्र सोमय्या यांना पूर्ण विराम मिळाला. या झालेल्या प्रकाराने ते चौथाळून उठले, मग ते स्थानिक पक्षाच्या, राजकारण्यांच्या मागे हात धुवून लागले. त्यांनी बरीच मेहनत घेतली. त्यात वाद नाही. ह्या गोष्टीसाठी जनता त्यांच्या बाजूनेच आहे, त्यात शंका नाही. मग काही मोहरे गजा आडही, गेले. त्यामुळे सोमय्याजी, लोकप्रिय झाले. मीडियावर त्यांनी खुल्लम खुल्ला आवाहन केले की! अमुक पक्षाचे आमदार खासदार हे लवकरच कंही कारणास्तव तुरुंगात जातील? अनेकांची अवैध संपत्ती जप्त होऊ शकते व ते कारावासात ही जातील?त्यामध्ये,कांहीं जेल मध्ये गेलेही.त्यांच्या या कामगिरीने जनता ही त्यांच्यावर खुश!पण त्यांनी येथे मोठी चूक केली,
त्यांनी फक्त विरोधी पक्ष व त्या स्थानिक संघटने बरोबर पंगा घेतला. पण आपल्या पक्षातही तशा प्रकारची लोकं आहेत का?त्यांनी जरा तपासून पाहिलं असतं तर!कांहीं तरी सापडले असते, मासे त्यांच्या गळाला. असे त्यांनी केले नाही,हेच त्यांना भारी पडले. तुला किंवा तराजू किंवा वजन काटा समान तोलायचा असतो.जर जराशी परडी,इकडे तिकडे झाली!तुम्ही काटा चोर किंवा काटा मारणारा काळ्या यादी जाता. अशी अवस्था आपली अवस्था झालेली आहे. आपण जरा सर्वांगीण विचार करून समान न्याय दिला असता, तर आपली वाहवा आणखी झाली असती.मोठे मोठे हातोडे घेऊन, सगळ्यांना संगती घेऊन,त्याच हातोड्याचा चा दांडा तुमच्या हातामध्ये आणि हातोड्याचे वजनदार तोंड, जर का आपल्यात पक्षातील लोकांनवर वापरलं असतं तर तुम्हाला जनतेची वाहवा मिळाली असती आणि आज जी अवस्था आहे तुमची, ती झाली नसती.पण तुम्ही जेव्हा दुसऱ्याचं काढता! मात्र स्वतःच झाकून ठेवता,!मग कसं चालेल? त्यांची हाय! ही तुम्हाला लागणारच. तुम्ही कोणासाठी करता? कोणाच्या इशारा वरन करता? हे जनता जाणते.फक्त तमाशा पाहणे हे जनमाणसांचे काम आहे. हे तुम्ही लक्षात घ्या! सोमय्या साहेब,राजकारणी म्हटलं की, बाई बाटली,पैसा,संपत्ती या आपोआप गोष्टी आल्याच. फक्त कोणत्याही राजकारणी असो पुन्हा मी येथे, स्पष्ट करतो! की जे राजकारणी हे धंदे करत नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही इथे काय बोलत नाही,जे प्रामाणिक आहेत. ते प्रामाणिक आहेत, त्यात शंका नाही. त्यामुळे शोधल्यावर आपल्याला आपल्या व इतर पक्षात सापडले असते. ते काम तुम्ही केलेले नाही.एकतर्फी तुम्ही बोटीचा सुकाणू तुम्ही चालवला.येथे तुमची फसगत झाली. हे राजकारण आहे,हो! येथे कुणाचं कोण नसतं? मुलगा बापासाठी नसतो, बाप मुलाचा नसतो. असे किती तरी किस्से पहिले आहेत,ते आपणही जाणता. दोन्ही हातांनी सुकाणू हा वल्लवायचा असतो, हे काम आपण केलेल नाही, हे केलं असतं तर बोट बरोबर धक्क्याला लागली असती. कदाचित हे काम आपल्याच आपसातील माणसांनी केलेलं असेल किंवा तुमच्या विरुद्ध असणाऱ्यांनी केलेल असेल,नाहीतर राजकीय परिस्थितीचा कल पाहून, पाहून,तुमच्याच पक्षाने भूमिगत निर्णय घेऊन,तुमचा गेम केला असेल. असे जनता जनार्दनांना वाटते. कारण इथे कोण कोणाचा नाही. सध्या तुम्ही जे ट्रक भरून पुरावे कारवाई करण्याचे घेऊन, ज्यांच्या विरोधात मीरवत होतात, तेच तुमच्या आता पक्षात विराजमान झाले आहेत,त्यांचं काय? तुम्ही केलेल्या आरोपांच तक्रारीचे काय? हा गोतावळा पक्षाच्या गळ्यापर्यंत आला असावा? म्हणूनच तुम्हाला संपवायचा कट नाही ना? असा पक्का जनमताचा कौल आहे? कारण राजकरणात वापरा व फेकून द्या! अशी स्थिती असते. असो! आपली सध्या जी क्लिप किंवा पेन ड्राईव्ह विधानसभेत पेश केलेल आहे, ते जर सगळ खर असेल! तर मग आपली राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकते?असे लोकांना वाटते.सगळ्या राजकारण्यांनी, सर्वांगीण स्वच्छ असावे!अशी आम जनतेची भावना असते.त्यामुळे हा झालेला गेम मोठा आहे.पण दहा गोष्टीं मधल्या, दोन-तीन गोष्टी तरी खरे असतीलच?ते तुम्हाला व न्याय देणाऱ्या परमेश्वराला माहिती? कारण आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.त्यामध्ये पण ते इतके साजेस नाही. कारण चोर जेव्हा चोरी करतो,तेंव्हा तो प्रथमदर्शनी, नाहीच म्हणतो. मग अनेक पुरावे सादर केल्यावर मग त्याचा गुन्हा साबित होतो.तशी तुमची अवस्था आहे का? आपण आता व्हेंटिलेटर वर आहात हे लक्षात घ्या! फक्त आपल्या पक्षाने चौकशी इमानीपणे केली पाहिजे. नाहीतर नागपूरकर आहेतच तुम्हाला क्लीन चिट द्यायला. कारण ई डी, लाचलुचपत आयकर, अवैध संपत्ती गोळा करणे,अशी वाम मार्गाची शिक्षा तुमच्या पक्षाला दिली स्वरांच्या आशीर्वादाने होत नाही.जर का! याच्या दबावाने, तुमच्या हद्दीत कोण आला त्याला तर नाहीच नाही.हे लोक जाणतात.परवा दूरचित्रवाणीवर विरोधक पेन ड्राईव्ह अध्यक्षांना देताना, विरोधी पक्ष नेते म्हणाले की, या ड्राइव्ह मध्ये आपण मराठी महिलांचा अगदी खालच्या हिन दर्जाने अपमान केलेला आहे.असा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि हे जर का सत्य असेल तर भूमिपुत्र म्हणून आमच्या सारख्यांची अस्मिता जागेल,हे प्रकरण आपल्याला जड जाण्याची शक्यता आहे. शिवाय भूमि पुत्रांचे वैर, हे आपल्याला रसातळाला घेऊ जाऊ शकते, हे आपण जाणून घ्या.जर का आपण हे कृत्य किंवा कृती आपण केली असेल, तर हा अंगाशी येईल,हा भूमिपुत्र जनतेला कौल आहे,हे आपण जाणून घ्या.या भारताच्या घटनेमध्ये समता, बंधुता या गोष्टी तेथे ठीक वाटतात.पण या राष्ट्रात जातीयवाद, धर्मवाद,प्रांतवाद हा रहणारच. तुम्ही जर जातियवाद करून सामाजिक तफावत निर्माण करत असाल, तर भूमिपुत्र तुम्हाला गाडल्या शिवाय राहणार नाही, हे माझं मत नाही भूमिपुत्रांच्या स्पष्ट मत आहे. कारण तुम्ही केलेली कृती जर का, खरी असेल तर संपूर्ण जनमत आपल्या विरुद्ध गेल्यावर, आपल्या पक्षातही भूमिपुत्र आहेत, त्यांच्याही जीवाला लागेल. ते तुम्हाला अदृश्यपणे तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नहित,शंका नाही.हे जनता पाहत आहे. सगळ्यांना आपला धर्म आपली जात प्यारी आहे.आपल्या महिलानचा आदर ही प्यारा आहे. त्यामध्ये स्वार्थी महिलांची गोष्ट येत नाही. संपूर्ण राष्ट्रात मराठी माणसा सारखा, समंजस, मैत्री करणारा, माणूस सापडणार नाही. म्हणून येथे मुंबईत व महाराष्ट्रात, घटनेचा आधार घेऊन,अनेक जाती,जमातीचे, धर्मांचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत. हे भूमी पुत्रांची मोठी मने आहेत. आधिच परप्रांतीच आक्रमण! सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. ते विषमतही, मनामध्ये आहेच. आता तर तुमच्यासारखे लोक आमच्या आया बहिणीवर जात असाल, तर मग पहा! हा सुद्धा भडकलेला, मराठी माणूस एकसंध होताना दिसत नाही,पण घटना गळ्यापर्यंत आली तर मग सोडत पण नाही.मग कुणाची पण खैर नाही.ही भूमिपुत्रांच्या मनातील कळकळ आहे.त्यामुळे,साहेब आपण संयमाने वागावे.तुमची राजकिय सत्ता तुम्हाला,मुबारक?भूमिपुत्रांच्या वाटेला जाऊ नये,ही मराठी माणसांची अपेक्षा आहे. आहे.तुमच्या रजकरणाशी त्याला काहीच लेंन देण नाही.ते तुम्हाला मुबारक!