
प्रतिनिधी:वैशाली महाडिक
मुंबई,गोरेगाव चे माजी आमदार व नागरी निवारा परिषदेचे शिल्पकार दिवंगत प.बा सामंत यांच्या पत्नी केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या संस्थापक विश्वस्त कुसुमताई सामंत यांचे आज दिनांक 30 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता वृद्धापकाळाने आपल्या राहत्या घरी गोरेगाव पूर्व येथे वयाच्या 98 वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला.
त्यांचे अंतिम संस्कार सोमवारी रात्री 9.45 वाजता शिवधाम स्मशानभूमी पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगाव पूर्व येथे सीएनजी दाहिनी करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने सामंत परिवाराचे हितचिंतक श्रद्धांजली व अभिवादनासाठी करायला जमा होते.
त्यांच्या पश्चात गिरीश आणि सुकन्या सामंत, डॉ. गीता सामंत, नीलम आणि कांचन नेरकर आणि नातवंडे असा परिवार आहे.
शनिवार दिनांक 4जून ,रोजी सायंकाळी 6 वाजता केशव गोरे स्मारक ट्रस्ट सभागृह, आरे रोड गोरेगाव पश्चिम मुंबई येथे कुसुमताईंच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी आदरांजली सभा ठेवण्यात आली आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा गिरीश सामंत व नीलम नेसकर , पाच नातवंडे व त्यांची मुले असा परिवार आहे. त्यांचा मुलगा गिर्यारोहक अरूण सामंत यांचे काही दिवसांपूर्वी हिमालयातील गिर्यारोहण मोहिमेत अपघाती निधन झाले होते.