
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,गांधी जयंती निमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले गेले. त्यातील एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे घाटकोपर पश्चिम येथे आयोजित केलेला कॉफी with गांधी हा कार्यक्रम. चाय पे चर्चा ऐकायची सवय झालेल्यांना गांधी बरोबरच्या कॉफीबद्दल उत्सुकता नसली तरी कार्यक्रमाला प्रतिसाद खूपच चांगला मिळाला. ‘भारत सेंटर’च्या वतीने लिटिल फ्लॉवर स्कूल, अमृत नगर, घाटकोपर, येथे झालेल्या या कार्यक्रमात गांधीची ओळख समजून घेण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते.
इंडियन नॅशनल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गांधी विचारांचे अभ्यासक विचारवंत डॉ.विवेक कोरडे यांनी गांधी विचारांची आजची गरज अधोरेखीत केली आणि मग प्रश्न उत्तरांच्या संवादी माध्यमातून गांधीजी आणि गांधी विचारांबद्दलच्या समज गैरसमजाबद्दल संवाद साधला. वॉट्सअप युनिवर्सिटीतून गांधीजींबद्दल पसरत असलेला द्वेष आणि त्यातून वायरल होणारे प्रश्न याबद्दल या प्रश्न उत्तरांतून चांगलाच उहापोह झाला. अशा प्रकारच्या द्वेषमूलक प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे कशी द्यावीत याचा वस्तुपाठच डॉ विवेक कोरडेंनी दिलेल्या उत्तरांनी घालून दिला.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील “इंडिया आघाडी” मधील घटक पक्ष, सामाजिक संस्था, संघटना आणि हितचिंतक यांनी एकत्र यावे, आपआपसातील संवाद वाढावा आणि गांधी जयंतीच्या निमित्ताने नव्याने वाटचाल करावी असा उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.
गांधी बद्द्ल असलेले गैर समज दूर व्हावेत म्हणून गांधी समजून घेण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ.विवेक कोरडे हे प्रमुख पाहुणे होते.गांधी बद्द्ल असलेले गैरसमज लोकांनी सुरुवातील प्रश्नातून विचारले तर त्याला मुद्देसूद उत्तर डॉ.कोरडे यांनी दिले.फाळणी,
सामाजिक कार्यकर्ते शरद कदम आणि काँग्रेसचे नेते केतन भाई शहा यांनी पुढाकार घेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अब्राहम रॉय मणी होते.इंडिया आघाडी मधील काँग्रेस,राष्ट्रवादी,आप, ओबीसी एन टी पार्टी पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.तर राष्ट्र सेवा दल,अंधश्रद्धा निर्मूलन समिती,युवा क्रांती सभा,महाराष्ट्र खाजगी शिक्षक संघटना आदी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
घाटकोपरचे माजी आमदार वीरेंद्र बक्षी,डॉ.बाबुलाल सिंह,राम गोविंद यादव, गौरांग गांधी,संजय कोकरे, अन्वर दळवी, सिरत सातपुते,शहाजी पाटोदेकर,निर्मला माने,डॉ.आर.एम. पाल,मनीषा सुर्यवंशी,शरीफ खान,विशाल हिवाळे,ज्ञानदेव हांडे,शिवराम सुखी,मनोज राजभर तसेच काँग्रेस,राष्ट्रवादी,आप पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
घाटकोपर येथील अमृतनगर येथील लिटिल फ्लॉवर शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी बरोबरच माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचीही आज जयंती. गांधीजी आणि शास्त्रीजी यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. महाअनिसच्या कार्यकर्त्या निर्मला माने यांनी साबरमतीके संत तुने कर दिया कमाल या गीताने सुरवात केली. सत्य, अहिंसा या मूल्यांची रुजवणूक करुन स्वातंत्र्य आंदोलन यशस्वी करणाऱ्या गांधीजीची गाथा सांगणाऱ्या या गीतानंतर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता शीवराम सुखी यांनी मिल के चलो या गीतातून एकत्र येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
आजच्या गांधी जयंतीच्या दिवशी संपूर्ण देशभरातील लोकानी एकत्र येऊन संविधानिक मूल्ये आणि लोकशाही संस्थांची जोपासना, संवर्धन आणि संवर्धन हे भारतीय प्रजासत्ताकातील प्रत्येक जबाबदार नागरिकाचे सर्वोच्च कर्तव्य आहे हे मानून शपथ घेतली. भारत जोडो अभियानाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आजच्या या कार्यक्रमातही उपस्थितांनी शपथ घेतली.
राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते शरद कदम आणि इंडीयन नॅशनल काँग्रेसचे केतन शहा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. आजचा हा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते आणि राजकिय कार्यकर्ते या दोघांच्याही सहभागाने झालेला राजकीय सामाजिक अभिसरणाचा प्रयोग होता आणि प्राथमिक टप्प्यावर तरी तो यशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही.
