
प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : काश्मीर आपल्या महाराष्ट्रातही आहे.ह्याचा प्रत्यय आपल्याला येतो!जेव्हा साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात कास पठार
सातारा येथे एक दृश्य पहायला मिळते!हा एक निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल, कारण ह्याच ठरलेल्या दिवसात, ही फुले येथे निसर्ग येथे पाठवतो आणि हे पठार नाना प्रकारच्या फुलांनी सजते.त्यावेळेस ते लोभस रूप डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक येथे वळतात.पण ह्या महाराष्ट्रातील काश्मिरची भुरळ आता सातासमुद्रापार आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांनाही पडायला लागली आहे. कोरियातील पर्यटकांनी येथील नामांकित “हेरिटेज”वाडी ह्या कास पठारावरील संपत जाधव ह्यांच्या राहण्याच्या व जेवणाच्या
ठिकाणी आपला लवजमा बसवला. तर ह्या परदेशी पाहुण्यांचे स्वागत संपत जाधवांनी हलगी वाजंत्रीने केले. त्यावेळी त्यांना मराठमोळी
गांधी टोप्याही मानाने परिधान करण्यात आल्या.तर नव्याने सुरू करण्यात आलेल्या बैलगाडीची ही सफर त्यांनी हौसेने केली. हलगीच्या तालावर पाहुण्यांनी तालही धरला.ह्या कार्यक्रमाला एखाद्या मिरणुकीचे स्वरूप प्राप्त
झाले होते.सध्या कास पठार!ह्या फुलांनी बहरलं आहे.पण सतत पडणाऱ्या पावसाने ह्या फुलांना इजा होत असल्याने, कदाचित हा हंगाम लवकर संपण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे हजारोंच्या संख्येने पर्यटक येत आहेत व निसर्गाची मजा हेरिटेज वाडीत लुटत आहेत.
नेहमी आपल पण आपल्या देशातच सापडणार आपल्या देशातच माणुस कि जपली जाते महणुनच बाहेर देशातील लोक आवरजुन आपल्या देशात येतात
आपल्या देशातच माणुस कि जपली जाते महणुनच बाहेर देशातील लोक आवरजुन आपल्या देशात येतात
आपल्या देशातच माणुस कि जपली जाते महणुनच बाहेर देशातील लोक आवरजुन आपल्या देशात येतात
Ohh खूपच छान