प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली :9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज रुग्णालयात झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पश्चिम बंगाल सरकारचे वकील कपिल सिब्बल आणि सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहता यांनी सीबीआयच्या वतीने सीजेआय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर स्थिती अहवाल सादर केलासुनावणीदरम्यान मुख्य न्यायधीश डी. वाय.चंद्रचूड यांनी प्रश्न उपस्थित केला की, प्राचार्यांचे घर आणि कॉलेजमध्ये किती अंतर आहे? यावर एसजी म्हणाले की हे अंतर सुमारे 15-20 मिनिटे आहेत्या नंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सुनावणी एका आठवड्यासाठी तहकूब केली. नवीन स्टेटस रिपोर्ट दाखल करावा, असे ते म्हणाले.पुढील सुनावणी 17 सप्टेंबर ला होईल.