प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : मे महिना आला की साधारणपणे शेवटच्या आठवड्यापासून कोळी बांधव! आपल्या बोटी किनाऱ्यावर आणतात.पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी,त्या व्यवस्थित झाकून ठेवतात.रंग रंगोटी करतात, बुडापासन खरडवून साफ करतात,बोटींच्या चिरा वेस्टनाने भरतात,बोटींचे इंजिन, पंखे , फाळके ह्यांची डागडुजी
सवड असल्यानेअसल्याने करतात, दुरुस्तीही मोठी चालते,फाटलेल्या जाळ्या विणतात, साधारणपणे नारळी पौर्णिमेला!समुद्र देवतेला नारळ अर्पण करुन,पुन्हा बोटी पाण्यात मासेमारीला सोडतात.पण जून ते सप्टेंबर पर्यंत समुद्र हा खवळलेला असतों,त्यामुळे सरकारी आदेशानुसार,बंदरात लाल बावटा टांगलेला असतो.हा इशारा कोळी बांधवांसाठीच असतो.की आपण आपल्या बोटी ह्या काळात सामुद्रि जलस्थिति व ती अचानक बदलाची शक्यता असल्याने अनेक वादळे येण्याची शक्यता असते.त्यामुळे सरकारी आदेश असतो की,आपल्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी नेऊ नये किंवा आपण स्वतः जाऊ नये.ह्या या बाबत माध्यमात ही बातम्या असतात, त्या द्वारे कोळी बांधवांना सावधानतेचा इशारा असतो. शिवाय हा काळ माश्यांचा प्रजनाचा असतो.परंतु काही बांधव हा नियम पायदळी तुडवून आपल्या बोटी ह्या वादळात मासेमारीसाठी पाण्यात
घेऊन जातात व आपल्या जीवाशी खेळतात.नुकतीच एक ताजी घटना अलिबाग विभागात घडलेली आहे.उरण तालुक्यातील कोळी बांधवाने आपली बोट! शनिवारी मासेमारीसाठी समुद्रात सोडली. सुसाट वादळी वारे व उंच उसळणाऱ्या लाटांमुळे सदर बोट ही खांदेरी ह्या जलदुर्गा जवळ जलसमाधीत झाली. एकंदर ९ माणसे ह्या बोटीवर होती. त्यामध्ये ६ लोकांनी आपला जीव कसाबसा वाचवला.पण ३ लोक अजून बेपत्ता आहेत.काय गरज होती का? अशा भयाण परिस्थितीत,बोट सामद्रात नेऊन मासेमारी करायची.आपण सर्व ह्या दिवसांत समुद्राची अवस्था पाहता!सरकारने दिलेला इशाराही पाहता.मग जाणून बुजून कशाला आपला व लोकांचा जीव धोक्यात घालायचा.आज ३ बेपता आहेत?जबाबदार तुम्हीच!मग ह्या गोष्टी पहायला कोणीतरी राजकीय हस्ती येणार,त्यांच्या कुटुंबाला सांत्वन करण्याचे ढोंग करणार, किनाऱ्यावर फेरी मारणार, लोकांचा जमाव समोर आला की मग एकदम!कांहींतरी लाखांची मदत जाहीर करणार. सरकारी आदेश असताना,आपण तो न जुमानता आपल्या सहित इतरांनाही आपण मरण्याच्या दारात ढकलताय!ह्या आपत्तीला सरकार जबाबदार आहे का? अशा बेफिकीर माणसांना मदत का करायची?
जीवाशी खेळ का
Don’t break rules and put your life at risk
Don’t break rules and put your life at your risk