
प्रतिनिधी:मिलन शाह
दिवा आगासन रोड येथे गणेश पाले नावाचा 24 वर्षीय तरुण बाईकने घरी परतताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या मुळे रस्त्यावर कलंडल्याने मागून येणाऱ्या टँकर खाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झसोया।या दुर्दैवी घटने मुळे दिवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.तरुण ओंकार नगर येथे राहणारा असल्याचे समजले तसेच पोलीस अपघाती गुन्हा नोंदवून पुढीलतपास करत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
दिवा आगासन रोडवर युवक गणेश विठ्ठव पाले (वय : 24) हा युवक बाईकवरुन घराकडे परतत असताना रस्त्यातील खड्डात येवून टँकरखाली कलंडल्याने जागीच ठार झाल्याची दुखद घटना घडली आहे.या घटनेमुळे दिवा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सबंधित युवक ओमकार नगर येथील रहीवाशी असल्याची माहीती मिळत असून या घटनेनंतर दिवा पोलीसांनी चौकशी सुरु केली आहे.