
एसएमएस-प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई,: महिलेच्या खुनाचा तपास अल्पावधीत उकलून दाखवल्याबद्दल मालवणी पोलिस पथकाचा मुंबई पोलिस आयुक्त देवेन् भारती यांनी गौरव केला. या निमित्त आयुक्तांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सन्मानपत्र प्रदान केले.
या पथकात पोलीस निरीक्षक जीवन भातकुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रथमेश विचारे आणि त्यांच्या टीमचा समावेश असून, त्यांच्या तात्काळ आणि व्यावसायिक तपासामुळे गुन्ह्याची उकल शक्य झाली.
आयुक्त देवेन् भारती यांनी टीमचे कौतुक करताना सांगितले की, “अशा तात्काळ आणि व्यावसायिक तपास प्रक्रियेने मुंबई पोलिस विभागाची प्रतिमा अधिक मजबूत होते.”
या प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Congratulations sir.
मालवणी पोलिस पथकाचा सफ़ल वेलफेयर सोसायटी मालवणी मलाड वेस्ट तरफे खुप खुप शुभेच्छा
Great अभिनंदन मालवणी पोलिसांचे
प्रत्येक खाकी वर्दीतील पोलीसांनी वरील मालवणी पोलीस पथकामधील पोलीस निरीक्षक जीवन भातकुले व सहाय्यक पोलीस प्रथमेश विचारे यांच्या सहभागी तुमचा आदर्श घ्यायला हवा.