
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त शंभर वर्षीय महिलेची हिप जॉईंट सर्जरी यशस्वी.शंभर वर्षीय महिला काकू बाई चौधरी यांची हीप जॉईंट सर्जरी यशस्वी रित्या पारपाडली. उपचारासाठी 100 वर्ष वयाची काकूबाई चौधरी महिला रुग्ण युनायटेड मल्टि स्पेसिऍलिटी हॉस्पिटल मध्ये दाखल झाली होती.तसेच त्या अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त होत्या त्यामुळे हिप जॉईंट सर्जरी करने हे मोठे धोक्याचे आणि धाडसाचे होते. मात्र युनायटेड रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी प्रथम रुग्णाचे रक्तदाब, ॲनिमिया,सेरेब्रल इन्फ्राक्ट,हायपोनायट्रेमिया या सर्व व्याधींची प्रथम मेडिकल मॅनेजमेंट केली.त्या नंतर अस्थिरोग तज्ञ डॉक्टर हिमांशू वकील, सुनील वाघ आणि भुलतज्ञ डॉक्टर कार्तिक शहा यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात युनायटेड हॉस्पिटलच्या टीमने काकूबाई चौधरी वर यशस्वी शस्त्रक्रिया केली.जवळपास आठवडा भर उपचारा नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.व त्या सुखरूप आपल्या घरी पोहोचल्या . काकूबाई चौधरी ने भावुक होत रुग्णालयातील डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना भरभरून आशीर्वाद दिले. या प्रकारे खऱ्या अर्थाने काकू बाई आणि त्यांच्या कुटुंबाची होळी आनंददायी झाली. अशी माहिती-डॉ.ब्रिजेश पांडे-डायरेक्टर -युनायटेड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांनी दिली या पूर्वी ही कोरोना काळात अनेक वयस्कर ज्येष्ठ नागरिकांना बरं करून हसत खेळत घरी पाठवले होते.