
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : जोगेश्वरी पूर्व प्रताप नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नुकतेच त्यांचा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आय कॅम्प आणि आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन एस बी एस हॉस्पिटल आणि आरव आय केअर च्या माध्यमातून करण्यात आले होते.या वेळी जवळपास सातशे ते आठशे नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घेतल्याचे अध्यक्ष अविनाश मुदलीयार यांनी सांगितले.मोतीबिंदू, डायबिटीस, बीपी तपासणी देखील यात करण्यात आली.जोगेश्वरीतील एक नावाजलेले आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मंडळ म्हणून प्रताप नगर चा उल्लेख होतो.गणपतीच्या दहा दिवसात अनेक गणेशभक्त गणरायाच्या चरणी शैक्षणिक साहित्य आणि किराणा सामान देखील अर्पण करीत असतात.विसर्जन झाल्यावर जमा होणाऱ्या गोष्टी एखाद्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने सुपूर्द करण्यात येतात.मागील अनेक वर्ष हा उपक्रम सुरू आहे.
स्तुत्य जपक्रम
Good work
असे स्तुत्ता उपक्रम सर्व सार्वजनिक मंडळानी केले पागिजेल