गणेशोत्सवापूर्वी शाळांचे वेतन होणार – मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

Share

प्रतिनिधी:वैशाली महाडिक

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आॅगस्ट महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र शिक्षक परिषदने दि. 3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले होते. मागील 2 वर्षात कोविड महामारीमुळे कोकणासह इतर भागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी गणेशोत्सवासाठी आपल्या मूळगावी जाऊ शकले नव्हते.
यावर्षीचा गणेशोत्सव 31 आॅगस्टपासून सुरु होत आहे. कोकणासह राज्यातील बहुतांश भागातील लोक आपल्या मूळगावी हा सण साजरा करतात. या सणाची पूर्वतयारी करता यावी आणि सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी या महिन्याचे वेतन दि. 25 आॅगस्टपूर्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पाठपुरावा सुरु ठेवला होता.
शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी आजच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे आॅगस्ट महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी व्हावे, यासाठी निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेत संबंधित निवेदन अर्थखात्याकडे पाठवून गणेशोत्सवापूर्वी वेतन देण्याचे निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात नागो गाणार तसेच आशिष शेलार यांनीही या महिन्याचे वेतन लवकर होण्यासाठी पाठपुरावा केला होता. शिक्षक परिषदेनेही शिक्षण सचिव, वित्त सचिव यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा केला होता.
आज मुख्यमंत्र्यांनी याबाबत वित्त विभागाला या महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी करण्याबाबत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आशिष शेलार व प्रशासकीय अधिकारी यांचे आभार मानले आहेत.अशी माहिती शिवनाथ दराडे कार्यवाह – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद – मुंबई


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *