प्रतिनिधी : वैशाली महाडिक

मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व पत्रकार गणेश हिरवे यांना आम्ही मुंबईकर या आघाडीच्या साप्ताहिकाच्या वतीने नुकताच आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे संपादक प्रमोद सूर्यवंशी यांनी सांगितलें.हिरवे हे मुंबई महाराष्ट्रातील आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार असून कायमच विविध विषयांवर त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन सुरू असते.उपक्रमशील आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून लोक त्यांना ओळखतात.आजही विभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. आजपर्यंत केलेल्या चांगल्या कार्यासाठी त्यांना दीडशेहून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत.पुरस्कार अधिक जोमाने काम करण्याची शक्ती प्रेरणा देतात असे हिरवे यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सांगितले.हिरवे यांची जॉय नावाची सामाजिक संस्था देखील आहे.येत्या २७ जुलै २५ रोजी जोगेश्वरी स्थित अस्मिता जुनी शाळा या ठिकाणी उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवे यांचा सन्मान होणार असून अनेकनी त्यांना शुभेच्छा अभिनंदन केले आहे.