प्रतिनिधी : मिलन शहा
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त उद्या गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता फोर्ट येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मंत्रालय जवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत शांती मार्चचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.
लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी हा शांती मार्च काढण्यात येणार आहे. या शांती मार्चमध्ये महाविकास आघाडी, जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती आणि सामाजिक संस्था, संघटना व इतर समविचारी पक्ष, संघटना यांचे सदस्य व पदाधिकारी सहभागी होणार आहेत असेही राजहंस म्हणाले.
Bade chalo
Great