प्रतिनिधी :मिलन शहा.
दिल्ली :गुजरात मधील बिलकीस बानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाने 11 दोषींची सुटका रद्द केली.तसेच बिल्किस बानो प्रकरणाशी संबंधित आदेशात कोणताही बदल होणार नाही, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सरकारच्या विरोधात केलेल्या टिप्पण्या काढून टाकण्याची याचिका ही सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा न्यायल्यावरील विश्वास प्रबल होणार आणि बिलकीस बानो सह भारतातील इतर पीडित महिलांना ही न्याय व्यवस्थेवर विश्वास वाढणार आणि त्यांना ही न्याय मिळणार अशा त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. हा निकाल भारतीय न्याय व्यवस्थेवर सामान्यांचा विश्वास वाढवणारा आहे.