गुणवंत विदयार्थ्यांचा गौरव सोहळा..

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

मुंबई : रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज मुंबई संचालित बालविकास विद्यामंदिर दहावी मार्च २०२५ मधे यशस्वी झालेल्या गुणवंत विदयार्थ्यांचा संस्था व शाळेतर्फे गौरव समारंभ आयोजित केला होता. या समारंभात गुणवंत विदयार्थ्यांचा रोख पारितोषिके व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्याच बरोबर विदयार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचा पुष्पगुच्छ व रोख बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सरचिटणीस श्री.जितेंद्र पवार यांनी केले तर कार्यक्रमास प्रमुख पाहूणे आमदार अनंत (बाळा) नर व उदयोगपती श्री.संदिप तावडे उपस्थित होते.आलेल्या पाहूण्यांचे स्वागत मुख्याद्यापक श्री.जगदिश सुर्यवंशी सरानी श केले. ९७.६०% मार्क्स मिळवून शाळेतून प्रथम आलेली कुमारी अश्मी महेश सावंत, ९६% मार्क्स मिळवून द्वितीय क्रमांक मिळविलेली निधी महेश सावंत व ९५% मिळवून तृतीय आलेली कुमारी श्रेया संतोष सुतार, आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल मधून ९६.६०% मार्क्स मिळवून प्रथम आलेला कुमार प्रसाद नारकर तसेच सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थी संघटनेने मराठी भाषा प्रोत्साहन साठी विद्यार्थ्यांना भेट वस्तू दिल्या. राजमुद्रा प्रतिष्ठान चे प्रशांत मोरे यांनी अश्मि सावंत ला शिवप्रतिमा देऊन गौरविले.प्रमुख पाहूणे आ.बाळा नर यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या व आईवडील, शिक्षक, शाळा व संस्था यांना कधीच विसरू नका असा संदेश दिला. प्र.पाहूणे श्री.संदिप तावडे यानी नेहमीच कोणते ना कोणते मग मराठी,इंग्रजी,हींदी पुस्तक वाचत रहा. आज अनेक क्षेत्र आहेत आपण ज्यात करीअर करू शकता असे सांगितले.कार्याध्यक्ष श्री.सहदेव सावंत यानी शाळेचा शंभर टक्के निकाल लावल्या बध्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक व सेवक वर्गाचे कौतुक केले व सर्वांनीच आज जगात होणार्‍या नविन नविन घडामोडींची व क्षेत्रांची माहीती ठेवली पाहीजे असे सांगितले . सावंत पुढे म्हणाले की लाईफ टाईम लर्निंग हा जीवनात यशस्वी होण्याचा सक्सेस मंत्रा आहे. तसेच बालविकास विद्या मंदिर चा माजी विदयार्थी संघ आहे,यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे विदयार्थ्यांना आवाहन केले. तद समयी संस्थेचे खजिनदार विनोद बने प्रशासकीय समिती अध्यक्ष सुबोध बने यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. तद समयी उपकार्याध्यक्ष अशोक परब सहसचिव यशवंत साटम व सुरक्षा घोसाळकर तसेच सहखजिनदार विजय खामकर, सीईओ दिपक खानविलकर,कार्यकारणी सदस्य सुशिल चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका योगिता पाटील व वंदना धोडी यांनी केले.आलेल्या पाहूण्यांचे व पालकांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता झाली.


Share

2 thoughts on “गुणवंत विदयार्थ्यांचा गौरव सोहळा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *