
प्रतींनीधी:
मुंबई,गोरेगाव पूर्वेकडील,गोगटे वाडी परिसरात गेली दहा वर्षांहूनही अधिक काळ ह्या ठिकाणी विकासक आलेले आहेत.पण विकासक व जुने इम्ला मालक यांचे साटे लोटे असल्याने,जुन्या इमला मालकाने,ज्यांचे वडील मुनिम होते किंवा केर ट्टेकर होते,ते अचानक मालक कसे झाले?हा येथील लोकांना मोठा प्रश्न पडलेला आहे.तर प्लॉट नो.171 व इतर ठिकाणी ह्या इमला मालकाने, विनाकारण भाडेकरूंन वर, विकासकाच्या संगमताने केसेस केल्या असल्याचे आरोप स्थानिक करत आहे आणि प्लॉट रिकामे करावे असा तगादा लावलेला आहे.चार पिढ्यान् पासून राहणाऱ्या लोकांना येथून अचानक अशा पद्धतीने काढणं शक्य आहे का?अशी चर्चा सद्या परिसरात रंगली आहे.तर प्लॉट 171वर राहणाऱ्या,लक्ष्मीबाई चाळीतील काही भाडेकरू हे विकासकाच्या , ताटा खालचे मांजर आहेत.विकासकाच्या सांगण्यावर व चालीवर ते नाचत असून ते आपल्या सोबत या चाळीतील रहिवश्यांचीही दिशाभूलही करीत आहेत.कोणताही मागच पुढचा विचार न करता,ते भाडेकरू ,विकासकाच्या कागदावर सह्या करून घेत आहेत.हे चुकीचं आहे.कदाचित ह्या भाड्यांना विकासक काहीतरी लालूच दाखवीत असावा .असा लोकांना संशय आहे.कारण वाडीचा विकास होण्यासाठी,एकजूट होन आवशक आहे!अश्या चमच्यांन मुळे,फूट पडत आहे.अशी लोकात कुजबुज आहे.अशा अडेल तत्तू व भाड खाऊ लोकांनां,गरीब भाडेकरूंची वाट लाऊन काय मिळेल!? ह्या चाळीतील एका महशहाने तर कमालच केली आहे.लक्ष्मी चाळीतील लोकांना फित्वून ,विकासकाच्या दावणीला बांधलेले आहे.लोकांना त्याची ही चाल समजल्यावर,आता त्याला विरोध होत असताना,तो महाशय आता शहाणा होऊन,त्याने आता लक्ष्मी चाळीतील आपले स्वतःचे राहते घर विकायला काढलेले आहे.त्याच्या घराची किंमत दलाल ठरवत आहे.हे घर विकासाकच्या ताबायात असताना,तो आपले घर विकतो कसा?आरे व्वा!हा पठ्ठा लोकांची दिशाभूल तर करत नाहीना?कि त्यांना खड्ड्यात घालून,आता स्वतःची चामडी वाचवायला,आपले राहते घर दावणीला लावतो.मग लोकांना दिशाहीन करण्या पूर्वी ह्या गोष्टीचा विचार करायला हवा कि नाही अशी ही चर्चा येथील रहिवाशी आपसात करत आहेत. लक्ष्मी चाळीतील रहिवाश्यांनी सावध राहून वेळीच डाव ओळखाव!त्याच्या पासून व इतर चाटुकारा पासून सावध राहावे!हायपुढे कोणताही अर्ज ,छापील कागदावर ,माहिती घेतल्याशिवाय,सह्या करते वेळी विचार करावा.हे जाणून घ्या!अश्या टिमकी वाजवणाऱ्या माणसांवर नझर ठेवा.त्याला घर विकताना विरोध करा?त्याने केलेल कृत्य त्याने व्यवस्थित करून जावे ,मगच आपले घर विकण्याचा निर्णय घ्यावं .अशा गोष्टींना रहिवासी आतून विरोध करत आहेत.