
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई : ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभागाचे नवीन वाचन केंद्राचे उद्घाटन दिनांक ०९ /११ /२०२५ रोजी सायंकाळी ५ .०० वाजता मुंबई कांदिवली पश्चिम दत्त मंदिर येथे जेष्ठ नागरिक संघा तर्फे ज्येष्ठ सभासद श्रीमती उमाताई अकोलकर यांच्या हस्ते झाले .
कार्यक्रम छान व नीटनेटका झाला.सर्व सभासदांची आपुलकी व जिव्हाळा वाखाणण्याजोगा होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष प्रभाकर पटवर्धन यांनी केले तसेच ग्रंथ तुमच्या दारी मुंबई सह समन्वयक श्री घनश्याम देटके यांनी अत्यंत सुंदर शब्दांत ग्रंथ तुमच्या दारी योजनेची माहिती दिली .वाचन संस्कृती कशी वाढवावी यावर महापौर पुरस्कार प्राप्त सेवा निवृत्त शिक्षिका परिणिता माविनकुर्वे विचार मांडले उपस्थित वाचकांना आपले अनुभव सांगितले तसेच ,मधुकर माने ,नारायण पवार हे ही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह मिलिंद शिर्के यांनी केले
ज्येष्ठ सभासद श्रीमती उमाताई अकोलकर यांनी ८२ व्या वर्षी पदार्पण केल्याने त्यांचा संघातर्फे सत्कार करण्यात आला. दत्त मंदिराचे मधुकर सहमते पण उपस्थित होते
ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभागा कडे कुलाबा ते भाईंदर, कुर्ला, कांजूर मार्ग,देवनार अश्या १८० ग्रंथ पेट्या आहेत .
घराजवळ उत्तम वाचनीय पुस्तके उपलब्ध होतात.
घर, सोसायटी ऑफिस,शाळा, मंदीर, हाॅस्पीटल, दवाखाना,आश्रम, तुरुंग,उद्यान,सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ,महिला मंडळ,पोलिस ठाणे इ. ठिकाणी वाचक केंद्रे सुरु आहे प्रत्येक ग्रंथ पेटीत १०० पुस्तके. दर चार महिन्यांनी एक पेटी बदलून दुसरी पेटी दिली जाते
मुंबईत कुठेही नवीन केंद्र सुरु करण्यासाठी मुंबई विभागाला संपर्क करा असे आवाहन मुख्य समन्वयक डॉ.महेश अभ्यंकर यांनी केले आहे संपर्क घनश्याम देटके
९८१९११८३६५.
उत्तम पुस्तके वाचनालयाच्या कपाटात न राहता ती वाचकांपर्यंत पोहचली पाहिजे. वाचकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन त्याच्यापर्यंत पुस्तके घेऊन गेल्यास वाचन संस्कृती वाढीला लागेल. ग्रंथ तुमच्या दारी योजने मुळे वाचकांना त्यांच्या आवडीचे साहित्य वाचायला मिळणार आहे. त्यामुळे हा उपक्रम ज्ञानसंवर्धन आणि वाचन अभिरुची वाढवणारा उपक्रम ठरेल असे घनश्याम देटके यांनी सांगितले अनेक वाचकांनी वाचनालयाला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले . या उपक्रमाला मुंबईत मोठा प्रतिसाद मिळत आहे.
वाचनाचा प्रचार, प्रसार होण्यासाठी शाळा, सोसायटी,सामाजिक संघटना, प्रत्येक केंद्रावर विविध उपक्रम राबविले जातात.आपले मित्र, कुटुंबातील सदस्य, समन्वयक हितचिंतक वर्ग यांना वाढदिवसा निम्मित विविध पुस्तके भेट देणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी , वाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश देऊन वाचन, संमेलन, व्याख्यान, भाषण, चर्चासत्र, सामूहिक वाचन, विविध स्पर्धा आदी उपक्रम राबवून वाचन संस्कृती लोकांत रुजवण्यासाठी ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जातात अशी माहिती सह समन्वयक घनश्याम देटके यांनी दिली .

स्तुत्य उपक्रम
Good
Good initiative