‘ग्रंथ तुमच्या दारी’ वाचन केंद्राचे डहाणूकर वाडीत उद्घाटन.

Share

एसएमएस :प्रतिनिधी -वैशाली महाडिक.

कांदिवली: कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक आणि ‘ग्रंथ तुमच्या दारी’ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी दत्त मंदिर परिसरात नवीन वाचन केंद्राचे उद्घाटन रविवार, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. हा उपक्रम ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला आहे.

या कार्यक्रमास महापौर पुरस्कारप्राप्त शिक्षिका परिणीता माविनकुर्वे आणि ‘ग्रंथ तुमच्या दारी’ मुंबईचे सहसमन्वयक घनश्याम देटके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वाचनालयाच्या स्थापनेत ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाह मिलिंद शिर्के यांनी पुढाकार घेतला आहे.

वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि सर्व वयोगटातील नागरिकांना वाचनाची सवय लागावी, या उद्देशाने या ग्रंथ पेटी वाचनालयाची स्थापना करण्यात आली आहे.

“या सुवर्णसंधीचा सर्व रहिवाशांनी लाभ घ्यावा,” असे आवाहन मुख्य समन्वयक डॉ. महेश अभ्यंकर यांनी केले आहे.

संपर्क : श्री. घनश्याम देटके – ९८१९११८३६५


Share

2 thoughts on “‘ग्रंथ तुमच्या दारी’ वाचन केंद्राचे डहाणूकर वाडीत उद्घाटन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *