घरेलू कामगार महिलेची निर्घृण हत्या..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मिरा-भाईंदर :मिरा-भाईंदरमधील काशीमिरा परिसरात एका ४० वर्षीय महिला घरकामगाराची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमन (पूर्ण नाव अद्याप समोर आलेले नाही) ही महिला चंदेश अ‍ॅकॉर्ड या निवासी संकुलात अनेक घरांमध्ये घरकाम करत होती. मंगळवारी (दि. २४) बिल्डिंग क्रमांक २७ मधील एका घरात तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.
आरोपीने तिच्या पोटात दोन, छातीत एक आणि मानेवर एक असे एकूण चार गंभीर वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती.
घटनेनंतर तिला तात्काळ गुरुकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच मीरारोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली असून, पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *