चंदूर येथील गणेशोत्सवात लघुपट संवाद संपन्न..

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

चंदूर: गणेशोत्सव म्हणजे समाजप्रबोधनाचे दिवस ही स्थिती अजूनही खेडोपाडी शिल्लक आहे. चंदूर येथील न्यू चांदणी चौक गणेशोत्सव मंडळवतीने लघुपट संवादासाठी आम्हां संविधान परिवारचे कार्यकर्ता यांना निमंत्रित करण्यात आले होते.

स्वागत सत्कारानंतर ब्लूमिंग फ्लाॅवर्स, वुमन्स अॅंथम, मॅन, उमज, शहीद भगतसिंग स्वप्न, शिवरायांचे आठवावे रुप, लड्डू, पहल आदि लघुपट दाखवून संवाद करण्यात आला. संवादक म्हणून संजय रेंदाळकर यांनी केले. त्यांचेसोबत अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा समन्वयक अशोक वरुटे आणि तांत्रिक सहकार्य करणेसाठी संवेदना फेलोशिपचे दामोदर कल्पना नागेश उपस्थित होते.

कार्यक्रम सुरू होताच पाऊस सुरू झाला, मनात आले की आता कार्यक्रम थांबवावा लागेल. पण १५-२० मिनिटांनी पाऊस थांबला व कार्यक्रम रंगत गेला. साधारण दोन तासाहून अधिक चाललेल्या या कार्यक्रमात चर्चेत सहभागी होणारेंना पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी महिला आणि आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष राजू पाटील यांनी आभार मानले.


Share

2 thoughts on “चंदूर येथील गणेशोत्सवात लघुपट संवाद संपन्न..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *