चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले ,त्यांचा पदभार मुख्यमंत्र्यांनी काढून घ्यावा :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ता ॲड. धनंजय जुन्नरकर

Share

प्रतिनिधी :मिलन शाह

मुंबई,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण संस्था उभारण्यासाठी भीक मागितली असे म्हणून या थोर महापुरुषांचा अपमान केला, त्या नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष ह्यांचा देखील एकेरी उल्लेख केला. स्वतःच्या मंत्रालयाचा कारभार नीट हाकता येत नाही व नुसती वाचळविर गिरी चालू आहे त्यामुळे जनतेमध्ये संताप पसरलेला आहे.

महापुरुषांचा अपमान करून वरून आपल्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता असे म्हणत त्यांनी नंतर सारवासारव केली. जनतेत त्याबद्दलही तीव्र रोष आहे पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यकर्त्यांने पाटील यांच्यावर शाईफेक केली. शाईफेक करण्याच्या प्रकाराचे काँग्रेस समर्थन करत नाही पण याप्रकारानंतर दहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले तर या घटनेचे वार्तांकन व व्हीडिओ शूट करणाऱ्या पत्रकाराला ३०७ सारखी कलमे लावून अटक करायला लावली. चंद्रकांत पाटील हे महापुरुषांपेक्षा मोठे आहेत का? त्या पत्रकारावर एवढी कठोर कलमे लावण्याची खरेच गरज होती का? पण सूडभावनेने पेटलेल्या सरकारने तत्परतेने कारवाई केली पण महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱ्या नेत्यांवर भाजपाने कारवाई केलेली नाही.

चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष ह्यांचा देखील एकेरी उल्लेख केलेला आहे तो काँग्रेस खपवून घेणार नाही.
चंद्रकांत पाटील यांची आगपाखड पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे दिसत असून त्यांची आम्हाला चिंता वाटत आहे, त्यांनी लवकर चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. चंद्रकांत पाटील व भाजपाच्या वाचाळ नेत्यांना देव सुबुद्धी देवो अशी आम्ही प्रार्थना करतो, असेही काँग्रेस चे प्रवक्ते ॲड. धनंजय जुन्नरकर म्हणाले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *