प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई, दि. २ मे
चांदिवलीमध्ये माँसाहेब मीनाताई ठाकरे मनोरंजन मैदानावर सत्ताधारी भाजपने जबरदस्तीने आणि बेकायदेशीरपणे मेळावा भरवला आहे. या मेळाव्याला वॉर्ड कार्यालयाने परवानगी नाकारली
असतानाही भाजपने कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीररित्या हा मेळावा भरवला.
भाजपने कायदा मोडला तर बीएमसी व मुंबई पोलीस बघ्याची भूमिका घेत असून
हे आम्ही खपवून घेणार नाही. माँसाहेब मीनाताई ठाकरे मैदानावरचा भाजपचा ‘कब्जा राज’ मोडीत काढून सर्व दोषींवर त्वरित FIR दाखल करा व बेकायदेशीर मेळावा हटवून मैदान मुलांसाठी मोकळे करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात भाजपा , मुंबई पोलीस व बीएमसीवर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, धक्कादायक म्हणजे भाजपच्या मुंबई अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जे या अनधिकृत मेळाव्याचे आयोजक आहेत, त्यांनी एका वर्तमानपत्राला स्वतःच ही कबूली देत परवानगी नसतानाही “सगळी तयारी आधीच झाली होती म्हणून मेळावा भरवला.” असे सांगितले, हा उद्दामपणा आणि सत्तेतून आलेली गुर्मी आहे. विशेष म्हणजे, चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशन आणि स्थानिक नागरिकांनी या बेकायदेशीर कार्यक्रम विरोधात तीव्र आक्षेप नोंदवला असताना हा मेळावा भरवण्यात आला. कोणतीही लाज शरम न बाळगता मुंबई उपनगरांचे पालकमंत्री आणि मुंबई भाजपाचे चे अध्यक्ष आशिष शेलार आणि इतर भाजप नेत्यांचे मोठे मोठे होर्डिंग या बेकायदेशीर मेळाव्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लावले गेले आहेत.
BMC आणि मुंबई पोलीस यांनी या अनधिकृत मेळाव्याविरोधात आधीच कारवाई का केली नाही? सामान्य नागरिक आणि विरोधी पक्षांवरच कारवाई होते का?
परवानगी नसताना मेळाव्याला लाईट, पाणी आणि इतर सोयी कोणी उपलब्ध करून दिल्या? मुलांच्या खेळाच्या मैदानावर कब्जा करणाऱ्यांवर अजून FIR का नाही? आणि पालकमंत्री स्वतः हे बेकायदेशीर कार्यक्रम प्रमोट करतात, हे चालतं का? असे प्रश्न विचारून
सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे नियम चालणार नाहीत. कायदा सर्वांसाठी सारखाच असला पाहिजे असे खासदार गायकवाड म्हणाल्या.
Very bad