मुंबई : बोरिवली पूर्व राजेंद्र नगर येथील चासकर कुटुंबाने यंदा गणेशोत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. कुटुंबातील नवीन सदस्याचे पहिले वर्ष पूर्ण होण्याच्या आनंदात हा उत्सव विशेष उत्साहाने पार पडला.
पर्यावरण प्रदूषण होऊ नये म्हणून चासकर कुटुंबाने यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. ‘रोप गणेश’ या संकल्पनेनुसार त्यांनी मातीपासून बनवलेली गणेशमूर्ती घरात आणली. सजावटीसाठी त्यांनी पंढरपूरच्या विठोबा दर्शनाचे थीम निवडले आणि सर्व साहित्य पर्यावरणपूरक ठेवले.
गणेशोत्सवाची सांगता करताना मूर्तीचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने न करता घराच्या टेरेसवरच केले. त्यानंतर त्याच ठिकाणी वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला.
आगामी काळातही अशाच पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प चासकर कुटुंबाने केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
खुप छान
सुंदर उपक्रम!!!
१ नंबर खूपच छान
सुंदर कल्पना!!!!
Well Done…Keep It Up!
पर्यावरण रक्षणासाठी अशी पावले उचलण्याची गरज आहे
छानच कल्पना आणि उपक्रम …!!!
Very good..
Khoop Chan idea . everyone should follow this to save our environment.
अतिसुंदर कल्पना…
अतिसुंदर कल्पना…
Khup chan.. Everyone follow