प्रतिनिधी :मिलन शहा
चीन चा आपल्या नागरिकांना तात्काळ इस्रायल सोडण्याचा दिला सल्ला
तेल अवीवमधील चिनी दूतावासाने आपत्कालीन इशारा जारी केला आहे की सर्व चिनी नागरिकांना तात्काळ इस्रायल सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे.सध्याच्या युद्धसदृश परिस्थिती आणि सुरक्षेच्या चिंता लक्षात घेऊन हा इशारा जारी करण्यात आला आहे.चिनी दूतावासाने म्हटले आहे की सुरक्षित स्थलांतराची योजना तयार केली जात आहे आणि ज्या नागरिकांना मदत हवी आहे त्यांनी तात्काळ दूतावासाशी संपर्क साधावा.चीनच्या या आवाहनावरून मध्य पूर्वेतील परिस्थिती किती गंभीर झाली आहे हे दिसून येते.