
प्रतिनिधी: सुरेश बोरले
लालबागचा लोकप्रिय व नवसाला पावणाऱ्या,ह्या गणेशाच्या पायाशी शिव मुद्रा प्रतिष्ठापन केलेली आहे.हा प्रकार लोकांना प्रदर्शनीय असावा किंवा छत्रपतींच्या मुद्रेस,गणेशाचरणी ठेवून,छत्रपतींचा मान राखावा हा मंडळाचा हेतू का?.मागची,भावना अतिशय चांगली आहे.पण एकंदरीत पाहता,शिवमुद्रेच स्थान हे देवाच्या पायावर नाही.जर त्या मुद्रेचा एक देखावा जर का छत्रपतींच्या प्रतीमेसोबत गणेश्या शेजारी असता तर?लालबागचा राजा आणखीन उठावदार दिसला असता.एका बाजूस देवांचा राजा,तर दुसऱ्या बाजूस,रयतेचा राजा!हे समीकरण छान जुळले असते.पण अजूनही वेळ गेलेली नाही,कांहीं शिवप्रेमी संघटना,तक्रार करण्या अगोदर,जर का ती शिवमुद्रा!योग्य मानासहित प्रतिष्ठापीत झाल्यास छान काम होईल.कारण छत्रपतींनी,अनेक गणपती दैवताची प्रतिष्ठापना अनेक देवळात केली.खास करून मातोश्रींच्या विनंती वरून !हे विशेष.त्यांनी कधीही राजमुद्रा,गजाननाच्या चरणी ठेवली नाही,तर मनाने गणपती बाप्पाच्या समोरम
मानाने ठेवली.हा ईतीहास आहे.राजाच्या मंडळाला,विनंती सर्व गणेश भक्तांन कडून आहे.आपण त्वरित,ह्या वादाला तोंड फुटण्या पूर्वी,प्रतिष्ठापना ह्या रजमुद्रेची योग्य ठिकाणी करावी.