
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
छत्रपती संभाजीनगर : अजित पवार गटाचे माजी तालुका अध्यक्ष प्रकाश गाडेकर आणि भाजपचे सय्यद हय्यासा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमात पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले.
या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद वाढणार असून भाजप आणि अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गाडेकर आणि हय्यासा यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भविष्यात शिवसेनेच्या ध्येयधोरणांसाठी काम करण्याची ग्वाही दिली.
या प्रसंगी शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
फक्त टिकीटा साठी येउ नका जनतेच्या हिता साठि या
अशाप्रकारे पुन्हा देशोधडीला सुरुवात झाली.
देख भाई देख …इलेक्शन आते आते क्या होता है।